लखनऊ: उत्तर प्रदेशातील निरक्षरपणाचे मुख्य कारण दारु हेच आहे. त्यामुळे राज्यात दारुबंदी करावी, अशी मागणी योगी सरकारमधील मंत्री ओम प्रकाश राजभर यांनी केली आहे. राज्यात दारुबंदी लागू झाल्यास उत्तर प्रदेशात साक्षरतेचे प्रमाण वाढेल. वाराणसी आणि आझमगढमध्ये दारुबंदीची मोहीम सुरु आहे. मथुरेतही दारुबंदी झाली आहे. एका सर्वेक्षणानुसार देशातील ६० टक्के लोक अशिक्षित आहेत. याचे मुख्य कारण दारु हेच असल्याचे ओम प्रकाश राजभर यांनी सांगितले.
याशिवाय, राजभर यांनी चिनी उत्पादनांवरही बंदी घालण्याची मागणी केली. चीनने भारतीय बाजारपेठ काबीज केली आहे. याच व्यापारातून मिळणाऱ्या पैशातून शस्त्रास्त्रे खरेदी करुन चीन भारताला धमकावत असतो. त्यामुळे चीनचा व्यापारी परवाना रद्द झाला तर भारतातील लाखो तरुणांना रोजगार मिळेल, असे ओम प्रकाश राजभर यांनी सांगितले.