नवी दिल्ली : Supreme Court hearing from today: महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षावर आज पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठापुढे सुनावणी होणार आहे. शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या मुद्यावर निवडणूक आयोगाने सुनावणी घ्यावी किंवा नाही यावर घटनापीठ सर्वात आधी सुनावणी घेणार आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगावरील स्थगिती उठणार का याकडे लक्ष लागले आहे. त्याचवेळी दुसरीकडे घटनापीठाच्या सर्व सुनावण्या आता लाईव्ह (Supreme Court Hearing Live) पाहता येणार आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची आजची सुनावणी लाईव्ह होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी आजपासून लोक घरी बसून पाहू आणि ऐकू शकतील, लिंक जारी करण्यात आली आहे. (Supreme Court hearing from today sitting at home, link released)
सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय दिला आहे. आता लोक घरबसल्या लाईव्ह स्ट्रिमिंगद्वारे सर्वोच्च न्यायालयातील खटले पाहू आणि ऐकू शकतील. त्यासाठी लिंकही जारी करण्यात आली आहे. या प्रकरणांमध्ये EWS आरक्षण, महाराष्ट्र शिवसेना वाद, दिल्ली-केंद्र वाद यासारख्या प्रकरणांचा समावेश आहे. मात्र, सध्या ही यंत्रणा प्रायोगिक टप्प्यात आहे.
सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी आता लोक घरी बसून पाहू आणि ऐकू शकतील. सर्वोच्च न्यायालयाने आज मंगळवारपासून (27 सप्टेंबर) घटनापीठासमोरील खटल्यांच्या सुनावणीचे थेट प्रक्षेपण करण्याची व्यवस्था केली आहे. या प्रकरणांमध्ये EWS आरक्षण, महाराष्ट्र शिवसेना वाद, दिल्ली-केंद्र वाद यासारख्या प्रकरणांचा समावेश आहे. सुनावणीदरम्यान, लोक webcast.gov.in/scindia/ या लिंकवर जाऊन सुनावणी पाहू आणि ऐकू शकतील.
सध्या याबाबत कोणतीही स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे नाहीत, मात्र सूत्रांच्या माहितीनुसार, ही लिंक केवळ सुनावणी आणि सुनावणीसाठी असेल. हे प्रसारण कोणत्याही प्रकारे पुन्हा प्रसारित केले जाऊ शकत नाही. सध्या ही यंत्रणा प्रायोगिक टप्प्यात आहे.