Reserve Bank of India : भारतीय रिझर्व बँकेकडून (Reserve Bank of India) बँकांसंदर्भात आणि आर्थिक घडामोडींबाबतीत सतत योजना आखल्या जातात. काही वेळा नियमांमध्ये बदल देखील केला जातो. मागच्या आठवड्यामध्ये पुणे येथे असलेल्या रुपी सहकारी बँक लिमिटेडचं (Rupee Co-operative Bank Limited) लायसन रद्द केलं. त्याचबरोबर, 22 सप्टेंबरपासून त्या बँकेच्या सेवा देखील बंद केल्या आहेत. आत्ता देखील आरबीआयने (RBI) कठोर निर्णय घेत महाराष्ट्राच्या आणखी एका बँकेवर कारवाई करत तब्बल 50 लाख रुपयांचा दंड केला आहे.
भारतीय रिझर्व बँकेकडून जळगाव पीपल्स सहकारी बँकेवर तब्बल 50 लाख रुपयांची कारवाई केली आहे. नियामांच उलंघन केल्या प्रकरणी ही कारवाई केली गेली आहे.
भारतीय रिझर्व बँकेने 31 मार्च, 2020 पर्यंत आर्थिक स्थितीच्या आधारावर महाराष्ट्रातील बँकांची पाहणी केली होती. सहकारी बँकेने ठरवलेल्या नियमांनुसार नॉन परफॉरमिंग अॅसेट्सच्या (NPA) स्वरुपात वर्गिकरण केलं नव्हतं. त्याचबरोबर, खातेदारांना कोणतीही सुचना न देता सेविंग अकाउंटमध्ये मिनिमम बॅलेंस न ठेवल्याने दंडात्मक कारवाई केली आहे.
काही नियमांच्या उलंघनामुळे इतर 9 सहकारी बँकांवर दंडात्मक कारवाई केंद्रीय बँकेने केली आहे. भारतीय रिझर्व बँकेच्या (RBI) मते, ही कारवाई नियामक अनुपालनच्या (Regulatory compliance) अभावावर आधारतीत असून याचा उद्देश बँकेने तिच्या खातेदारांसोबत केलेल्या कोणत्याही व्यवहाराच्या किंवा कराराच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा नाहीये.