संतापजनक | तंदूर रोटी बनवणारी व्यक्ती चक्क रोटीवर थुंकतेय, व्हीडिओ व्हायरल

तंदूर रोटी बनवणारी ही व्यक्ती चक्क रोटीवर थुंकत आहे. 

Updated: Dec 6, 2021, 11:09 PM IST
संतापजनक | तंदूर रोटी बनवणारी व्यक्ती चक्क रोटीवर थुंकतेय, व्हीडिओ व्हायरल

मुंबई : आजवर तुम्ही डर्टी पाणीपुरी पाहिलीत, डर्टी खारी-टोस्टही पाहिलात. आता आम्ही तुम्हाला जे दृश्य दाखवणार आहोत ते पाहून तुमच्या तळपायाची आग मस्तकात जाईल. तुमच्या आरोग्याशी कोण खेळ करतंय, हे आपण या रिपोर्टमधून जाणून घेऊयात. (person who makes tandoori roti is spitting on tandoori roti video viral on social media)

अलिकडे हॉटेलमध्ये किंवा लग्नसंमारंभात जेवणामध्ये चपाती किंवा भाकरीऐवजी तंदूर रोटीला पहिली पसंती दिली जाते. गरमागरम, खुसखुशीत तंदूर रोटी दाबून खाणारे कमी नाहीत. पण तुम्ही खात असलेली तंदूर रोटी कशी तयार होते, त्याचाच एक किळसवाणा व्हिडीओ समोर आलाय.

तंदूर रोटी बनवणारी ही व्यक्ती चक्क रोटीवर थुंकत आहे. सोशल मीडियात या थुंकीवाल्या तंदूर रोटीचा व्हिडीओ वेगानं व्हायरल होत आहे.

मेरठच्या कंकरखेडातल्या साखरपुड्याच्या संमारंभावेळी हा प्रकार घडलाय. मांडवात वराडी चवीनं तंदूर रोटी खात होते. मात्र रोटी बनवणारा नौशाद त्यांच्या आरोग्याशी खेळत होता. काही जणांना याची कुणकुण लागली आणि त्यांनी या किळसवाण्या प्रकाराचा व्हिडीओ बनवला. 

याप्रकरणी पोलिसांनी नौशादला अटक केली असून चौकशी सुरू केलीय. मात्र हे प्रकरण इथवरच थांबत नाही. याआधीही डर्टी पाणीपुरी आणि खारी टोस्ट चाटतानाचे व्हिडीओ समोर आले होते. त्यामुळे संबंधित यंत्रणांनी ही बाब गांभीर्यानं घेऊन अशा विकृत मानसिकतेच्या लोकांना कडक शिक्षा करायला हवी.