उद्यापासून स्वस्त होऊ शकते पेट्रोल-डिझेल, सरकार करु शकते घोषणा

पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतीने त्रस्त झालेल्या जनतेला दिलासा देणारी बातमी आलीये. उद्या अर्थात बुधवारपासून पेट्रोल-डिझेल स्वस्त होऊ शकते. 

Updated: May 22, 2018, 01:19 PM IST
उद्यापासून स्वस्त होऊ शकते पेट्रोल-डिझेल, सरकार करु शकते घोषणा title=

नवी दिल्ली : पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतीने त्रस्त झालेल्या जनतेला दिलासा देणारी बातमी आलीये. उद्या अर्थात बुधवारपासून पेट्रोल-डिझेल स्वस्त होऊ शकते. सरकार यासाठी तेल कंपन्यांसोबत मिळून योजना बनवतेय. सूत्रांच्या माहितीनुसार, याप्रकरणी पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची मंगळवारी संध्याकाळी तेल कंपन्यांसोबत बैठक होती. या बैठकीत वाढत्या किंमती कमी करण्यासाठी नवा फॉर्म्युला सुरु केला जाऊ शकतो. दरम्यान वाढत्या किंमती कमी करण्यासाठी कोणता तोडगा काढण्यात आलाय हे स्पष्ट झालेले नाहीये. मात्र वाढत्या किंमतीतून थोडा दिलासा सामान्या जनतेला मिळू शकतो. 

एक्साईज ड्युटी कमी होणार की दर घटणार?

पेट्रोलियम मंत्री धर्मेद्र प्रधान सतत पेट्रोल-डिझेलच्या किंमती जीएसटीअंतर्गत आणण्याचा विचार करतायत. मात्र राज्य सरकारांनी याला विरोध केलाय. एक्साईड ड्युटी घटवल्यानेही दरांवर तितकासा परिणाम होणार नाही आणि सरकारी खजिन्यावर भर पडणार आहे. पेट्रोल-डिझेलचे दर सध्या गगनाला भिडलेत. 

का महाग होतेय पेट्रोल ?

गेल्या ४ आठवड्यांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमती वाढल्याने पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ होतेय. स्थानिक सेल्स टॅक्स आणि वॅटनुसार प्रत्येक राज्यात पेट्रोल-डिझेलच्या किंमती वेगवेगळ्या आहेत. देशातील इतर राज्ये आणि मेट्रो शहरांच्या तुलनेत राजधानी दिल्लीत हे दर सर्वात कमी आहेत.

९ दिवस सतत वाढतायत किंमती

मंगळवारी पेट्रोलच्या दरात ३० पैशांची वाढ झाल्यानंतर दिल्लीत हे दर ७६.८७ वर पोहोचले. याआधी दिल्लीमध्ये १४ सप्टेंबर २०१३मध्ये दिल्लीच्या दरांनी ७६.०६ इतका उच्चांक गाठला होता. याशिवाय डिझेलच्या किंमतींनीही उच्चांक गाठलाय. कर्नाटक निवडणुकीच्या १९ दिवस आधी किंमतीतील चढ-उतारावर प्रतिबंध घालण्यात आला होता. ही बंदी १४ मेला संपली. त्यानंतर ९ दिवसांपासून सातत्याने किंमतीमध्ये वाढ होतेय. 

मुंबईत सर्वात महाग पेट्रोल

देशाची आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोलच्या किंमती सर्वाधिक ८४.७० रुपये आहेत. भोपाळमध्ये या किंमती ८२. ४६ रुपये प्रती लीटर आहेत.