पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ

पेट्रोल आणि डिझेल पुन्हा महागलं

Updated: Sep 6, 2018, 09:27 AM IST
पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ title=

मुंबई : पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढण्याची मालिका आजही सुरुच आहे. आजही पेट्रोलच्या दरात 20 पैशांनी तर डिझेलच्या दरात 21 पैशांनी वाढ झाली आहे. दिल्‍लीमध्ये डिझेल 71.55 रुपये प्रति लीटर झालं आहे. बुधवारी दिल्लीमध्ये डिझेल 71.34 रुपये प्रति लीटर होतं.

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरामुळे देशात लोकांमध्ये राग आहे. बुधवार डिझेल आणि पेट्रोलच्या दरात कोणतीही वाढ झाली नाही पण गुरुवारी मात्र पुन्हा एकदा वाढ पाहायला मिळाली. मुंबईमध्ये पेट्रोल 86.91 रुपये प्रति लीटर आहे. 19 पैशांनी वाढ पाहायला मिळत आहे. मुंबईमध्ये डिझेल 75.96 रुपये लीटर विकलं जात आहे. बुधवारी डिझेल 75.74 रुपये प्रति लीटर होतं.

कोलकातामध्ये देखील पेट्रोल 19 पैशांनी वाढलं आहे. कोलकातामध्ये पेट्रोल 82.41 रुपये प्रति लीटर तर डिझेल 74.40 रुपये प्रति लीटर आहे.