मुंबई : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ झाल्याचं दिसून येतंय. पेट्रोल १० पैसे प्रति लीटर तर डीझेल १३ पैसे प्रति लीटर महागलंय. गेले पाच दिवस पेट्रोल-डिझेलच्या किंमतींत सतत वाढ झालेली दिसून येतेय. २७ फेब्रुवारी रोजी किंमतीत कोणताही बदल झाला नव्हता. त्यापूर्वी सलग दोन दिवस अगोदरही किंमतीत वाढ झाल्याचं दिसलं होतं. गेल्या पाच दिवसांपासून पेट्रोल ५१ पैसे तर डीझेल ६२ पैसे प्रति लीटर महागलेलं दिसून येतंय.
सोमवारी देशाची आर्थिक राजधानी मुंबईत एक लीटर पेट्रोलसाठी ७७.८० रुपये तर डीझेलसाठी ७०.७६ रुपये मोजावे लागत आहेत. तर राजधानी दिल्लीत सोमवारी पेट्रोल १० पैसे आणि डिझेल १३ पैशांनी महागलंय. एका लीटर पेट्रोलसाठी दिल्लीत ७२.१७ रुपये तर डिझेलसाठी ६७.५४ रुपये मोजावे लागत आहेत.
कोलकातामध्ये पेट्रोलची किंमत ७४.२६ रुपये तर डिझेलची किंमत ६९.३३ रुपये आहे. चेन्नईत पेट्रोल ११ पैसे प्रति लीटर आणि डिझेल १४ पैशांनी महागलंय. चेन्नईत पेट्रोलचा दर ७४.९५ रुपये आणि डिझेलची किंमत ७१.३८ रुपये आहे.
नोएडा आणि उत्तर प्रदेशाचं म्हणाल तर इथं पेट्रोल ८ पैसे आणि डीझेल ११ पैशांनी महागलंय. एक लीटर पेट्रोलसाठी ७१.७० रुपये आणि डिझेलसाठी ६६.४९ रुपये नागरिकांना मोजावे लागत आहेत.
गुरुग्राम आणि हरियाणामध्ये पेट्रोल ६ पैसे आणि डिझेल ९ पैशांनी महागलंय. एक लीटर पेट्रोलसाठी ७२.३४ रुपये आणि डिझेलची किंमत ६६.७० रुपये आहे.