पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जाहीर, जाणून घ्या तुमच्या शहरातील भाव

Petrol Diesel Price : सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल डिझेलच्या किमती जाहीर केल्या आहेत. त्यामुळे शनिवारीसुद्धा ग्राहकांना दिलासा मिळालेला आहे. 460 व्या दिवशीही दोन्ही इंधनांच्या दरांमध्ये कोणताही बदल झालेला नाही.

आकाश नेटके | Updated: Aug 19, 2023, 09:59 AM IST
पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जाहीर, जाणून घ्या तुमच्या शहरातील भाव title=
(फोटो सौजन्य - ANI)

Petrol Diesel Rate on 19 August 2023: सध्या देशात महागाईमुळे हाहाकार उडाला आहे. यावर मात करण्यासाठी मोदी सरकार (Modi Government) लवकरात लवकर काही पावले उचलण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वसामान्यांची महागाईतून सुटका होऊ शकते. यासोबतच पेट्रोल आणि डिझेलचे दरही (Petrol Diesel Price) लवकरच कमी होऊ शकते. दुसरीकडे सरकारी पेट्रोलियम कंपन्यांनी काही वेळापूर्वीच पेट्रोल-डिझेलचे दर नेहमीप्रमाणे जाहीर केले आहेत. तसेच वाहनचालकांना या दरामध्ये दिलासा कायम आहे. इंडियन ऑईल, बीपीसीएल, एचपीसीएलने पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर ठेवले आहेत. दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कोलकाता येथेही पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत.

दुसरीकडे, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किमतीमध्ये घट झाली आहे. ब्लूमबर्ग एनर्जीनुसार, ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल  84.25 डॉलर आहे. तर डब्ल्युटीआयची किंमत आता प्रति बॅरल 81.25 डॉलर आहे. रशिया-युक्रेन युद्धादरम्यान मार्च 2022 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रूडच्या किमती 139 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचल्या. असे असतानाही देशात इंधनाच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.

460 व्या दिवशीही दोन्ही इंधनांच्या दरांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. 21 मे 2022 रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल झाला होता. पोर्ट ब्लेअरमध्ये पेट्रोल 84.10 आणि डिझेल 79.74 प्रति लिटर दराने विकले जात आहे. दुसरीकडे, सर्वात महाग इंधन राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये आहे. श्रीगंगानगरमध्ये पेट्रोलची किंमत 113.48 रुपये आहे, तर डिझेलची किंमत 98.24 रुपये आहे. तसेच आजही अनेक राज्यांमध्ये पेट्रोल 100 रुपयांच्या वर विकले जात आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दिलासा मिळूनही ओडिशा, राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये डिझेल अजूनही 100 रुपयांच्या वर आहे.

चारही महानगरांमध्ये पेट्रोल डिझेलचे दर

- दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर
- मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर
- कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर
- चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.33 रुपये प्रति लिटर

भारताच्या तुलनेत पाकिस्तानमध्ये पेट्रोल-डिझेल 3 पटीने महाग 

दरम्यान, भारताचा शेजारी देश पाकिस्तानमध्ये महागाईमुळे सर्वसामान्यांचा जीव मेटाकुटीला आलेला आहे. पाकिस्तानची अर्थव्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर पोहोचली आहे. दुसरीकडे पाकिस्तानात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात अचानक वाढ झाली आहे. पाकिस्तानच्या काळजीवाहू सरकारने पेट्रोलच्या दरात सुमारे 180 रुपयांनी तर हायस्पीड डिझेलच्या दरात 20 रुपयांची वाढ केली आहे. या वाढीमुळे 1 लिटर पेट्रोलची किंमत 290.45 रुपयांवर आणि 1 लिटर डिझेलची किंमत 293.40 रुपयांवर पोहोचली आहे.