Petrol Price Today: पेट्रोल-डिझेलचे दर वाढले...; घरबसल्या जाणून घ्या आजचे दर

Petrol-Diesel Price Today : तेल कंपन्यांचे नुकसान भरून काढण्यासाठी सरकारकडून 20000 कोटी रुपयांचे पॅकेज देण्याच्या विचारात आहे. या निर्णयामुळे आगामी काळात एलपीजीसह पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीतही कपात होण्याची शक्यता आहे.

Updated: Sep 20, 2022, 09:08 AM IST
Petrol Price Today:  पेट्रोल-डिझेलचे दर वाढले...; घरबसल्या जाणून घ्या आजचे दर title=

Petrol-Diesel Price : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर गेल्या दोन महिन्यांपासून घसरत आहेत. पण सोमवारी संध्याकाळी बंद झालेल्या बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत किंचित वाढ झाली. असे असतानाही क्रूडची (Crude oil ) किंमत विक्रमी नीचांकी पातळीवर आहे. क्रूडच्या घसरणीचा देशांतर्गत बाजारातील तेलाच्या किमतीवर कोणताही परिणाम झाला नाही. पेट्रोल-डिझेलचे (Petrol-Diesel Price) दर गेल्या चार महिन्यांच्या पातळीवर कायम आहेत. (petrol diesel latest price 20th september latest rate)

सरकारकडून 20000 कोटी रुपयांचे पॅकेज?
तेल कंपन्यांचे नुकसान भरून काढण्यासाठी सरकारकडून 20000 कोटी रुपयांच्या मदतीचे पॅकेज देण्याचा विचार केला जात आहे. या निर्णयामुळे आगामी काळात एलपीजीसह (LPG) पेट्रोल आणि डिझेलच्या (petrol-diesel) किमतीतही कपात होण्याची शक्यता आहे. 1 सप्टेंबर रोजी तेल कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या (Gas cylinder) किमतीत कपात केली होती. क्रूडच्या घसरणीमुळे कंपन्यांनी पेट्रोल आणि एलपीजीच्या किमतीची भरपाई करण्याची स्थिती गाठली आहे.

यापूर्वी, सुमारे चार महिन्यांपूर्वी म्हणजेच 22 मे रोजी केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील (petrol-diesel) उत्पादन शुल्क कमी केले होते. त्यानंतर किंमतीत बदल झाला. यानंतर महाराष्ट्र आणि मेघालयमध्येही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल झाला आहे. मंगळवारी सकाळी WTI क्रूडची किंमत प्रति बॅरल $86.01 वर पोहोचली. तर ब्रेंट क्रूड प्रति बॅरल $92.40 वर दिसले.

पाहा तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेजचे दर 

- दिल्ली पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर
- मुंबई पेट्रोल 111.35 रुपये आणि डिझेल 97.28 रुपये प्रति लिटर
- चेन्नई पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर
- कोलकाता पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर
- नोएडामध्ये पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.96 रुपये प्रति लिटर
- लखनऊमध्ये पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.76 रुपये प्रति लिटर
- जयपूरमध्ये पेट्रोल 108.48 रुपये आणि डिझेल 96.72 रुपये प्रति लिटर
- तिरुअनंतपुरममध्ये पेट्रोल 107.71 रुपये आणि डिझेल 96.52 रुपये प्रति लिटर
- पाटण्यात पेट्रोल 107.24 रुपये आणि डिझेल 94.04 रुपये प्रति लिटर
- गुरुग्राममध्ये 97.18 रुपये आणि डिझेल 90.05 रुपये प्रति लिटर
- बेंगळुरूमध्ये पेट्रोल 101.94 रुपये आणि डिझेल 87.89 रुपये प्रति लिटर
- भुवनेश्वरमध्ये पेट्रोल 103.19 रुपये आणि डिझेल 94.76 रुपये प्रति लिटर
- चंदीगडमध्ये पेट्रोल 96.20 रुपये आणि डिझेल 84.26 रुपये प्रति लिटर
- हैदराबादमध्ये पेट्रोल 109.66 रुपये आणि डिझेल 97.82 रुपये प्रति लिटर
- पोर्ट ब्लेअरमध्ये पेट्रोल 84.10 रुपये आणि डिझेल 79.74 रुपये प्रति लिटर 

घरबसल्या जाणून घ्या आजचे दर 

तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे रोजचे दर एसएमएसद्वारे देखील जणून घेऊ शकता. इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवू शकतात आणि HPCL (HPCL) ग्राहक ९२२२२०११२२ या क्रमांकावर HPPRICE पाठवू शकतात. BPCL ग्राहक ९२२३११२२२२ या क्रमांकावर RSP पाठवू शकतात.