Petrol Diesel Price : कच्च्या किमतीत पुन्हा बदल! जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे आजचे दर

Petrol Diesel Price : आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाची किंमत आणि देशातील सर्व राज्यांच्या राजधानीत आज पेट्रोल आणि डिझेलचे दर काय आहेत जाणून घेऊया. दुसरीकडे, देशातील काही शहरांमध्ये पेट्रोलच्या दरात किरकोळ चढउतार दिसून आले आहेत.

आकाश नेटके | Updated: Aug 22, 2023, 10:07 AM IST
Petrol Diesel Price : कच्च्या किमतीत पुन्हा बदल! जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे आजचे दर  title=

Petrol Diesel Rate on 22 August 2023: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किमतीत घसरण होत आहे. गेल्या एका आठवड्यापासून कच्च्या तेलाचा दर प्रति बॅरल 85 डॉलरच्या खाली विकले जात आहेत. मात्र या दराने आता प्रति बॅरल 86 डॉलरचा टप्पा ओलांडला होता. पण भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात (Petrol Diesel Price) बऱ्याच दिवसांपासून कोणताही बदल झालेला नाही. 22 मे 2022 रोजी केंद्र सरकारने देशभरातील पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी केले होते. त्यानंतर आजपर्यंत पेट्रोल डिझेलच्या दरात कोणताही मोठा बदल झालेला नाही. 22 ऑगस्टलाही पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. 

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर त्यात वाढ नोंदवली जात आहे. ब्रेंट क्रूड ऑइलमध्ये 0.04 टक्के वाढ नोंदवली गेली आहे आणि ते प्रति बॅरल 84.49 डॉलरला विकले जात आहे. दुसरीकडे, डब्ल्यूटीआय कच्च्या तेलाच्या किमतीत आज 0.11 टक्क्यांनी घट झाली आहे आणि ते प्रति बॅरल 80.81 डॉलरवर व्यवहार करत आहे. यानंतरही भारतीय बाजारपेठेतील इंधनाच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.

बीपीसीएल, इंडियन ऑइल आणि एचपीसीएलने पेट्रोल आणि डिझेलचे नवीनतम दर जाहीर केले आहेत. देशातील तेल विपणन कंपन्यांनी 22 ऑगस्ट रोजी पेट्रोल आणि डिझेलचे नवीनतम दर जाहीर केले आहेत. आज नोएडा आणि लखनऊमध्ये तेलाच्या किमतीत थोडा बदल झाला आहे.

महत्त्वाच्या राज्यांमध्ये काय परिस्थिती?

देशाची राजधानी दिल्लीत 22 ऑगस्टलाही एक लिटर पेट्रोलची किंमत 96.72 रुपये आणि एक लिटर डिझेलची किंमत 89.62 रुपये आहे. यासोबतच देशाची आर्थिक राजधानी मुंबईबद्दल बोलायचे झाले तर, येथे पेट्रोल 106.31 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटरवर स्थिर आहे. त्याच वेळी, चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर 102.63 रुपये प्रति लीटर आणि डिझेलचा दर 94.24 रुपये प्रति लीटर आहे. तर कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे.