आठ दिवसानंतर पेट्रोल-डिझेलचे दर घटले

लागोपाठ ८ दिवस पेट्रोल-डिझेलचे दर वाढल्यानंतर आज बुधवारी हे दर कमी झाले आहेत.

Updated: Sep 25, 2019, 01:14 PM IST
आठ दिवसानंतर पेट्रोल-डिझेलचे दर घटले title=

मुंबई : लागोपाठ ८ दिवस पेट्रोल-डिझेलचे दर वाढल्यानंतर आज बुधवारी हे दर कमी झाले आहेत. सौदी अरामकोच्या दोन प्लांटवर ड्रोन हल्ला झाल्यानंतर आशियाई बाजारात क्रुड ऑईलची आयात कमी झाली होती, त्यामुळे इंधनाचे भाव वाढले होते. बुधवारी मुंबईमध्ये पेट्रोलचे भाव ७९.७९ रुपये तर डिझेल ७०.३७ रुपये झालं.

दिल्लीमध्ये पेट्रोलचे भाव ७४.१३ रुपये आणि डिझेलचे भाव ६७.०७ रुपये प्रती लीटर आहेत. कोलकात्यामध्ये पेट्रोल ७६.८२ रुपये, डिझेल ६९.४९ रुपये आहे. चेन्नईमध्ये पेट्रोल ७७.०७ रुपये आणि डिझेल ७०.९२ रुपये प्रती लीटरला मिळत आहे.

बुधवारच्या आधी लागोपाठ ८ दिवस पेट्रोलचे भाव २.१२ रुपये प्रती लीटर आणि डिझेल १.५४ रुपये प्रती लीटरने वाढले होते. मंगळवारी पेट्रोल २२ पैसे आणि डिझेल १४ पैसे प्रती लीटरनं वाढलं होतं. बुधवारी सकाळी ब्रेंट क्रुड ६१.६८ डॉलर प्रती बॅरल आणि डब्ल्यूटीआय क्रुड ५६.९७ डॉलर प्रती बॅरल किंमतीवर पोहोचले.