Petrol-Diesel Price : 'या' राज्यात 25 रुपयांनी स्वस्त होणार पेट्रोल

नव्या वर्षाची या राज्यानं दिली नागरिकांना भेट, या राज्यात पेट्रोल 25 रुपयांनी होणार स्वस्त... 

Updated: Dec 29, 2021, 07:02 PM IST
Petrol-Diesel Price  : 'या' राज्यात 25 रुपयांनी स्वस्त होणार पेट्रोल title=

नवी दिल्ली :  Petrol-Diesel Price: देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर दिवसेदिवस वाढत असताना एक राज्याने मात्र पेट्रोल स्वस्त करण्याचा निर्णय घेतला आहे. या राज्यात 25 रुपयांनी पेट्रोल स्वस्त मिळणार आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

झारखंडच्या मुखमंत्र्यांनी पेट्रोल डिझेलच्या किमतीसंदर्भात मोठी घोषणा केली आहे. सरकारला दोन वर्ष पूर्ण झाल्यानं मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली आहे. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी पेट्रोल-डिझेलसंदर्भात मोठी घोषणा केली आहे. 

BPL कार्डधारकांना मिळणार स्वस्त पेट्रोल

पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दराचा परिणाम गरीब आणि मध्यम लोकांवर होत आहे. जनतेची ही समस्या लक्षात घेऊन गरजूंना आणि कामगार वर्गाला प्रतिलिटर पेट्रोलमागे 25 रुपये सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. 26 जानेवारीपासून हा नवा निर्णय लागू करण्यात येणार, अशी घोषणा मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी केली आहे. 

ही सवलत फक्त बाइक-स्कूटर असलेल्या बीपीएल कार्डधारकांसाठीच असेल. अशा लोकांना एका महिन्यात जास्तीत जास्त 10 लिटर पेट्रोल अनुदानित दरात मिळू शकते. त्या लोकांना रेशनकार्ड घेऊन पेट्रोल पंपावर जावं लागेल. तिथे त्यांना पेट्रोलची पूर्ण किंमत मोजावी लागणार आहे.

रेशनकार्ड दाखवून पेट्रोल घेतलेल्या लोकांच्या खात्यावर सरकार 10 लिटर पेट्रोलवरील सूट म्हणून 250 रुपये त्याच्या खात्यात ट्रान्सफर करेल. 10 लिटरपेक्षा जास्त पेट्रोल घेतल्यास, कार्डधारकाला बाजार दरानुसार किंमत मोजावी लागणार, अशी माहिती झारखंड सरकारकडून देण्यात आली आहे. 

केंद्र सरकारकडूनही मिळणार सूट 

एक्साईज ड्युटी आणि व्हॅटमध्ये सातत्याने होणाऱ्या वाढीमुळे या वर्षी या पेट्रोलच्या किमती 100 रुपयांच्या वर पोहोचल्या आहेत. त्याच वेळी, डिझेलचा दरही अनेक राज्यांमध्ये 80-90 रुपयांवर पोहोचला होता. लोकांचा वाढता संताप पाहता केंद्र सरकारने दिवाळीच्या मुहूर्तावर पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात 5 रुपये आणि 10 रुपयांची कपात करण्याची घोषणा केली होती.

पेट्रोल डिझेलच्या दरात झारखंड सरकारनं 25 रुपयांची सूट दिली आहे. आता हेच आता हेच महाराष्ट्रात लागू करणार का? महाराष्ट्रात अशा प्रकारे पेट्रोल डिझेलचे दर कमी कधी करणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.