Petrol, Diesel Price Today : पेट्रोल आणि डिझेलचे चार राज्यातील दर

तुमच्या शहरातील दर जाणून घ्या

Updated: Jan 20, 2021, 08:28 AM IST
Petrol, Diesel Price Today : पेट्रोल आणि डिझेलचे चार राज्यातील दर  title=
मुंबई : सरकारी तेल कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत (Petrol-Diesel Price Today) आज बदल झालेले नाहीत. यामुळे ग्राहकांना खूप मोठा दिलासा मिळाला आहे. मंगळवारी दिल्लीत पेट्रोलचे दर सलग दुसऱ्या दिवशी २५ पैशांनी वाढले पण आज दरात कोणतेही बदल झालेले नाहीत.  सरकारी मालकिच्या इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लि. (आयओसी), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. (बीपीसीएल), हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. (एचपीसीएल) या कंपन्यांनी ६ जानेवारी रोजी पेट्रोल, डिझेलच्या दरांचा आढावा घेण्यास सुरूवात केली आहे. 
 
शहर पेट्रोल       डिझेल 
दिल्ली          ८५.२०      ७५.३८
मुंबई ९१.८० ८२.१३
कोलकाता  ८६.६३ ७८.९७
चेन्नई ८७.८५ ८०.६७

तुमच्या शहरातील दर जाणून घ्या 

पेट्रोल-डिझेलच्या किंमती एसएमएसद्वारे देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑयलच्या वेबसाइटनुसार, तुम्हाला RSP आणि आपल्या कोड लिहून ९२२४९९२२४९ नंबरवर एसएमएस करायचा आहे. प्रत्येक शहराचा कोड वेगळा असेल. यावरून तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर जाणू शकता. 

दिल्लीत १५  जानेवारीला पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. पेट्रोल आज प्रति लिटर 84.70 रुपये आणि डिझेल 74.88 रुपये दराने विकले जात होते. मुंबईत पेट्रोलचे दर प्रति लिटर 91.32 रुपये आणि डिझेलचे दर 81.60 रुपये आहेत.कोलकातामध्ये पेट्रोलचे दर प्रतिलिटर 86.15 रुपये आणि डिझेलची किंमत प्रतिलिटर 78.47 रुपये आहे.

चेन्नईमध्येही पेट्रोल 87.40 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 80.19 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. बंगळुरूमध्ये पेट्रोलचे दर प्रति लीटर 87.56 रुपये आणि डिझेलचे दर 79.40 रुपये प्रति लिटर आहेत.