मुंबई : इंधन कंपन्यांनी शुक्रवारी पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर करण्यात आले आहेत. गुरूवारी सलग दोन दिवस पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली. यानंतर दराने नवा उच्चांक गाठला. दिल्लीत पेट्रोलचे दर 35 पैशांनी तर डिझेलचे दर 09 पैशांनी वाढले आहेत. बुधवारी देखील पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ झाली. (Petrol Diesel Price Today 9th July 2021 : Fuel rates at record highs Check prices in Mumbai ) बुधवार-गुरूवारी सलग दोन दिवस इंधन दरवाढ झाल्यानंतर आज शुक्रवारी दर स्थिर आहेत.
देशाची राजधानी नवी दिल्लीत गुरुवारी पेट्रोलच्या दरात 35 पैसे आणि डिझेलच्या दरात 09 पैशांनी वाढ झाली. तर बुधवारीही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली होती. बुधवारी इंधन दरवाढीनंतर राजधानी दिल्ली आणि कोलकातामध्ये पेट्रोलची किंमत ही प्रतिलिटर 100 रुपयांच्या पुढे गेली होती. आज पेट्रोल-डिझेलच्या किंमती स्थिर असल्यानंतरही राजधानी दिल्लीत पेट्रोलची किरकोळ किंमत 100.56 रुपये इतकी पाहायला मिळत आहे. तर डिझेलचा दर हा 89.62 रुपये प्रतिलिटर इतका झाला आहे.
त्याशिवाय मुंबईत आज एक लीटर पेट्रोलची किंमत ही 106.59 रुपयांवर पोहोचली आहे. तर डिझेलची किंमत प्रतिलिटर 97.18 रुपयांवर पोहोचली आहे. कोलकातामध्ये आज प्रतिलीटर पेट्रोलची किंमत 100.62 रुपये आणि डिझेलची किंमत 92.65 रुपयांवर पोहोचली आहे. त्याचप्रमाणे चेन्नईमध्येही आज पेट्रोलची किंमत 101.06 रुपये प्रतिलीटर आणि डिझेलची किंमत 94.15 रुपये प्रतिलिटर इतकी झाली आहे.
जुलै महिन्यात सलग पाचव्यांदा पेट्रोलच्या दरात वाढ झाली आहे. तर तिसऱ्यांदा डिझेलच्या किंमती वाढल्या आहेत. यापूर्वी जून महिन्यात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती तब्बल 16 दिवस वाढवण्यात आल्या होत्या. तर मे महिन्यातही पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती 16 दिवस वाढवण्यात आली. किरकोळ इंधन दरामधील ही दरवाढ 4 मे 2021 पासून सुरू झाली आहे. यापूर्वी 5 राज्यांमधील निवडणुकांच्या दरम्यान सलग 18 दिवस पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये कोणताही बदल झाला नव्हता.
पेट्रोल-डिझेलचे दर दररोज बदलतात आणि सकाळी 6 वाजता अपडेट होतात. आपल्याला SMSद्वारे पेट्रोल आणि डिझेलचे दररोजचे दर देखील मिळू शकतात (How to check diesel petrol price daily). इंडियन ऑईलचे ग्राहक RSP लिहून 9224992249 क्रमांकावर आणि बीपीसीएल ग्राहक RSP लिहून 9223112222 या क्रमांकावर माहिती मिळवू शकतात. त्याचवेळी, एचपीसीएल ग्राहक 9222201122 या क्रमांकावर HPPrice पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.