आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीचा भडका; जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

Petrol Diesel Prices : आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतींवर आधारित, पेट्रोल आणि डिझेलचे नवीनतम दर भारतीय तेल कंपन्या दररोज सकाळी 6 वाजता जाहीर करतात. देशात तेलाच्या किमती एका वर्षाहून अधिक काळ स्थिर आहेत. मात्र राज्यस्तरीय करांमुळे वेगवेगळ्या शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमती बदलत असतात.

आकाश नेटके | Updated: Jul 14, 2023, 09:36 AM IST
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीचा भडका; जाणून घ्या तुमच्या शहरातील दर title=
(फोटो सौजन्य - PTI)

Petrol Diesel Prices : जगात क्रूड ऑईलच्या (crude oil) किमतीत सातत्याने वाढ होत आहे. जागतिक बाजारात गेल्या 24 तासांत कच्च्या तेलाच्या एका बॅरलची किंमत 82 डॉलरच्या जवळपास पोहोचली आहे. कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ होत असताना सरकारी पेट्रोलियम कंपन्यांनी आज सकाळी सहा वाजता पेट्रोल-डिझेलचे (Petrol Diesel Price) दर जाहीर केले आहेत. मात्र देशात आज 423 व्या दिवशीही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दिलासा मिळाला आहे. आजही पोर्ट ब्लेअरमध्ये देशातील सर्वात स्वस्त पेट्रोल 84.10 रुपये आणि डिझेल 79.74 प्रति लिटर आहे. तर, सर्वात महाग पेट्रोल-डिझेल राजस्थानमध्ये  विकले जात आहे.

कच्च्या तेलाच्या किमती गेल्या 24 तासांत पुन्हा वाढल्या आहेत. ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल 81.65 डॉलर पर्यंत वाढत आहे. जागतिक बाजारपेठेत डब्ल्यूटीआयचा दरही प्रति बॅरल 77.25 डॉलरवर पोहोचला आहे. रशिया-युक्रेन युद्धानंतर मार्च 2022 मध्ये आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल 139 डॉलरवर पोहोचल्या होत्या. असे असतानाही देशात इंधनाच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.

सरकारी तेल कंपन्यांच्या म्हणण्यानुसार, देशाची राजधानी दिल्लीत एक लिटर पेट्रोलची किंमत 96.72 रुपये आणि एक लिटर डिझेलची किंमत केवळ 89.62 रुपये आहे. यासोबत मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटरवर विकले जात आहे.  चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर 102.63 रुपये प्रति लीटर आणि डिझेलचा दर 94.24 रुपये प्रति लीटर आहे. तर कोलकात्यात पेट्रोल 106.03 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. गाझियाबादमध्ये पेट्रोल 14 पैशांनी महागले आहे आणि ते 96.58 रुपये प्रति लिटरवर गेले आहे, तर डिझेल 13 पैशांनी वाढून 89.75 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे.

भारतातील प्रमुख शहरांमधील पेट्रोल आणि डिझेलचे दर

मुंबई, महाराष्ट्रात पेट्रोल 106.31 रुपये, तर डिझेल 94.27 रुपये प्रति लीटर विकले जात आहे.

चंदीगडमध्ये पेट्रोल 96.20 रुपये आणि डिझेल 84.26 रुपये प्रति लिटर आहे.

अमृतसरमध्ये पेट्रोल 98.74 रुपये आणि डिझेल 89.04 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे.

चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर 102.63 रुपये आणि डिझेलचा दर 94.24 रुपये आहे.

इंदूरमध्ये पेट्रोलची किंमत प्रति लीटर 108.66 रुपये आणि डिझेलची किंमत 93.94 रुपये आहे.

जयपूरमध्ये पेट्रोलची किंमत प्रति लीटर 108.48 रुपये आणि डिझेलची किंमत 93.72 रुपये आहे.

पाटण्यात पेट्रोल 107.24 रुपये आणि डिझेल 94.04 रुपये प्रति लिटर आहे.