Petrol- Diesel Price : पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर, जाणून घ्या काय आहे तुमच्या शहरातील भाव?

Petrol - Diesel Rate : आज आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूड ऑइलची किंमत प्रति बॅरल $ 85.22 आहे. त्याच वेळी, WTI क्रूड प्रति बॅरल $ 80.82 वर आहे. देशातील इतर भागात तेलाच्या किमती काय आहेत ते जाणून घेऊया.

श्वेता चव्हाण | Updated: Apr 10, 2023, 09:27 AM IST
Petrol- Diesel Price : पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर, जाणून घ्या काय आहे तुमच्या शहरातील भाव? title=
Petrol Diesel Price Today on 10 April 2023

Petrol Diesel Price on 10th April 2023 : आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती गेल्या आठवडाभरापासून प्रति बॅरल 85 डॉलरच्या वर आहेत. आज (10 एप्रिल 2023) कच्च्या तेलाच्या दरातही वाढ नोंदवण्यात आली आहे. मात्र यानंतरही बराच काळ देशात पेट्रोल आणि डिझेलच्या (petrol diesel price) दरात कोणताही बदल झालेला नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूड ऑइलची किंमत प्रति बॅरल 85.22 डॉलर आहे. तर WTI क्रूड प्रति बॅरल $ 80.82 वर आहे. परिणामी अनेक शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या (petrol diesel rate) किमती बदलल्या आहेत. अनेक शहरांमध्ये इंधनाचे दर वाढले असून अनेक शहरांमध्ये दर कमी झाले आहेत. त्याचबरोबर देशातील महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.

महानगरांमध्ये तेलाची किंमत

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOCL) च्या अधिकृत वेबसाइट iocl.com च्या ताज्या अपडेटनुसार, राष्ट्रीय राजधानी दिल्लीत पेट्रोलची किंमत 96.72 रुपये आणि डिझेलची किंमत 89.62 रुपये प्रति लीटर आहे. त्याच वेळी, मुंबईत पेट्रोलचा दर प्रति लिटर 106.31 रुपये आणि डिझेलचा दर 94.27 रुपये प्रति लिटर आहे. याशिवाय चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 102.63 रुपये आणि डिझेलचा दर 94.24 रुपये प्रति लिटर आहे. तर कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे.

वाचा: कोरोनाचा उद्रेक झाल्यास आरोग्य सुविधांची सज्जता आहे का? देशभरात आज कोरोना उपायांची रंगीत तालीम

इतर प्रदेशात तेलाची किंमत

  • नोएडामध्ये पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.96  रुपये प्रति लिटर
  • पाटण्यात पेट्रोल 107.24  रुपये आणि डिझेल 94.04 रुपये प्रति लिटर
  • गुरुग्राममध्ये 97.18 रुपये आणि डिझेल 90.05 रुपये प्रति लिटर
  • लखनौमध्ये पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.76 रुपये प्रति लिटर
  • तिरुअनंतपुरममध्ये पेट्रोल 107.71 रुपये आणि डिझेल 96.52 रुपये प्रति लिटर
  • चंदीगडमध्ये पेट्रोल 96.20 रुपये आणि डिझेल 84.26 रुपये प्रति लिटर
  • हैदराबादमध्ये पेट्रोल 109.66 रुपये आणि डिझेल 97.82 रुपये प्रति लिटर
  • अजमेरमध्ये पेट्रोल 108.43 रुपये आणि डिझेल 93.67 रुपये प्रति लिटर
  • श्रीगंगानगरमध्ये पेट्रोल 113.65 रुपये आणि डिझेल 98.39 रुपये प्रति लिटर

महानगरांमध्ये इंधनाचे दर बदललेले नाहीत

  • दिल्ली- पेट्रोल 96.72 रुपये, डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर
  • मुंबई- पेट्रोल 106.31 रुपये, डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर
  • चेन्नई - पेट्रोल 102.63 रुपये, डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर
  • कोलकाता - पेट्रोल 106.03 रुपये, डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर 

दररोज सकाळी 6 वाजता नवीन दर जाहीर 

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट होते. त्यामुळेच पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढलेले दिसत आहेत.

घरबसल्या चेक करा नवे  दर 

तुम्ही घरबसल्या पेट्रोल-डिझेलचे नवे दर चेक करू शकता. त्यासाठी तुम्हाला इंडियन ऑइलचे ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड टाइप करून 9224992249 वर एसएमएस पाठवून माहिती मिळवा आणि BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 टाइप करून माहिती मिळवू शकतात.  त्याचबरोबर HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड 9222201122 वर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.