Petrol Diesel Price : आजचा पेट्रोल, डिझेलचा दर जाणून घ्या?

देशातील सर्वात महाग पेट्रोल-डिझेल कुठे?

Updated: Jul 19, 2021, 10:23 AM IST
Petrol Diesel Price : आजचा पेट्रोल, डिझेलचा दर जाणून घ्या?  title=

मुंबई : पेट्रोल-डिझेलच्या दराचा परिणाम कायमच सामान्यांच्या खिशावर होत असतो. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या दरात अनेक चढ-उतार पाहायला मिळत आहेत. देशातील अनेक शहरांत पेट्रोलच्या दराने 100 रुपये पार केलं आहे. रविवारी पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले नाहीत. सोमवारी 19 जुलै रोजी तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली नाही. आजही इंधनाचे दर स्थिर नाहीत. (Petrol Diesel Price Update 19th July 2021, Petrol Diesel Prices remain unchanged ) आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या वाढत्या दरात पेट्रोल-डिझेलचे दर वाढले आहेत. 

जुलै महिन्यात पेट्रोलचे दर नऊ वेळा वाढले आहेत. तर डिझेलच्या दरात 5 वेळा वाढ झाली. आणि एकदा स्वस्त देखील झाले. जून आणि मे महिन्यात पेट्रोल-डिझेलच्या दरात 16-16 वेळा वाढ झाली आहे.   4 मे 2021 पासून सुरू झाली आहे. यापूर्वी 5 राज्यांमधील निवडणुकांच्या दरम्यान सलग 18 दिवस पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये कोणताही बदल झाला नव्हता.

देशातील सर्वात महाग पेट्रोल-डिझेल कुठे?

देशभरातील सर्वात महाग पेट्रोल आणि डिझेल राजस्थानमधील गंगानगर आणि मध्य प्रदेशातील अनुपपूर या ठिकाणी आढळत आहे. गंगानगरमध्ये आज पेट्रोल 113.21 रुपये आणि डिझेल 103.15 रुपये दराने उपलब्ध आहे. तर अनूपपूरमध्ये आज पेट्रोलची किंमत 112.78 रुपये तर डिझेलची किंमत 101.15 रुपये प्रतिलिटर आहे.

या राज्यात पेट्रोलचा दर शंभरीपार

देशातील 17 राज्‍यात पेट्रोल का भाव 100 रुपये प्रति लीटर किंवा त्याहून अधिक झाले आहेत. राजस्‍थान, मध्‍य प्रदेश, महाराष्‍ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगना, लडाख, जम्‍मू कश्‍मीर, ओडिसा, तमिळनाडु, बिहार, केरळ, पंजाब, सिक्किम, पुड्डुचेरी , दिल्‍ली आणि पश्चिम बंगाल येथे दर वाढले आहे. भोपाळमध्ये 100 रुपये पेट्रोलचा दर आहे.