Petrol Diesel Prices: मोदी सरकारचा पुन्हा दिलासा, पाहा आतापर्यंत किती वेळा दरात केली कपात

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होत असताना मोदी सरकारने कर कमी करत पुन्हा एकदा जनतेला मोठा दिलासा दिलाय.

Updated: May 21, 2022, 08:06 PM IST
Petrol Diesel Prices: मोदी सरकारचा पुन्हा दिलासा, पाहा आतापर्यंत किती वेळा दरात केली कपात title=

Petrol Diesel Prices Cut : पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींबाबत वाढती नाराजी पाहता केंद्र सरकारने आज पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात मोठी कपात केली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे जनतेला मोठा दिलासा मिळणार आहे. सहा महिन्यांनंतर सरकारने दिलासा दिला आहे. यापूर्वी दिवाळीच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीवरील उत्पादन शुल्कात कपात केली होती. त्यानंतर सरकारने पेट्रोलवरील उत्पादन शुल्क 5 रुपयांनी आणि डिझेलवरील 10 रुपयांनी कमी केले. 

2014 मध्ये केंद्रात मोदी सरकार आल्यानंतर आतापर्यंत किती वेळा उत्पादन शुल्क कमी करण्यात आले आहे ते जाणून घेऊया.

2014 मध्ये मोदी सरकार सत्तेत आल्यानंतरच्या आकडेवारीनुसार, मोदी सरकारमध्ये आतापर्यंत तीन वेळा उत्पादन शुल्क कमी करण्यात आले आहे. 4 ऑक्टोबर 2017 रोजी मोदी सरकारने पहिल्यांदा पेट्रोलवरील उत्पादन शुल्क 19.48 रुपयांनी आणि डिझेलवरील 15.33 रुपयांनी कमी केले होते.

2018 मध्ये केंद्रातील मोदी सरकारने 4 ऑक्टोबर रोजी जनतेला मोठा दिलासा दिला. त्यानंतर सरकारने पेट्रोलवरील उत्पादन शुल्क 17.98 रुपयांनी तर डिझेलवरील 13.83 रुपयांनी कमी करण्याची घोषणा केली होती. 

4 नोव्हेंबर 2021 रोजी मोदी सरकारने दिवाळीच्या एक दिवस आधी महागाईचा सामना करणाऱ्या जनतेला भेट दिली. सरकारने पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात 27.9 रुपयांनी तर डिझेलवरील उत्पादन शुल्क 21.8 रुपयांनी कमी केले होते.

मोदी सरकारमध्ये पेट्रोल किती महाग झाले?

2014 मध्ये मोदी सरकार सत्तेवर आले तेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 110 डॉलर होती. त्यावेळी पेट्रोल ७२ रुपये प्रतिलिटर तर डिझेल ५५.४८ रुपये प्रतिलिटर दराने उपलब्ध होते. तेव्हा पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये 16 रुपयांपेक्षा जास्त फरक होता.

आजच्या कपातीपूर्वी राजधानी दिल्लीत पेट्रोल 105.41 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 96.67 रुपये प्रति लिटरने मिळत होते. मोदी सरकारचे हे आकडे बघितले तर गेल्या 8 वर्षात पेट्रोल 45 टक्के आणि डिझेल 75 टक्क्यांनी महागले आहे.