Petrol Price Today : पेट्रोलचे दर गगनाला भिडले; या शहरात सर्वात महाग पेट्रोल

जाणून घ्या या शहरांमध्ये पेट्रोल डिझेलचे दर

Updated: Jun 18, 2021, 10:19 AM IST
Petrol Price Today : पेट्रोलचे दर गगनाला भिडले; या शहरात सर्वात महाग पेट्रोल

मुंबई : पेट्रोल-डिझेलच्या दरात सतत वाढ होत आहे.  अनेक ठिकाणी  पेट्रोलने 100 चा आकडा पार केला आहे. राजस्थानमधील श्रीगंगानगरमध्ये पेट्रोलने 108 रुपयांचा आकडा पार केला आहे.  येथे एक लिटर पेट्रोलसाठी 108.07 रूपये मोजावे लागत आहेत. तर डिझेल 100 रूपयांवर गेला आहे. श्रीगंगानगर देशातील पहिला शहर आहे, जेथे पेट्रोलने 108 रूपयांचा आकडा पार केला आहे. आज पेट्रोल 27 पैसे प्रति लिटर महाग झाला आहे. तर डिझेल 28 पैशांना महागला आहे. आता 5 किलो कांद्याच्या दरात 1 लिटर पेट्रोल मिळत असल्यामुळे नागरिकांचं महिन्याचं गणित कोलमडलं आहे. 

4 मेट्रो शहरांमध्ये पेट्रोलची किंमत
शहर         कालची किंमत    आजची किंमत       
दिल्ली            96.66                 96.66
मुंबई             102.83              103.08
कोलकाता       96.58                96.84
चेन्नई              97.91                98.14

4 मेट्रो शहरांमध्ये डिझेलची किंमत
शहर      कालची किंमत   आजची किंमत   
दिल्ली           87.41          87.69
मुंबई            94.84          95.14
कोलकाता     90.25         90.54
चेन्नई            92.04          92.31

पेट्रोल-डिझेलचे दर SMSच्या माध्यमातून देखील जाणून घेता येऊ शकतात. इंडियन ऑईलचे ग्राहक RSP लिहून 9224992249 या नंबरच्या माध्यमातून पेट्रोल डिझेलचे दर जाणून घेऊ शकतात. बीपीसीएलचे ग्राहक RSP लिहून 9223112222 तर एचपीसीएल ग्राहक HPPrice लिहून 9222201122  या नंबरच्या माध्यमातून पेट्रोल डिझेलचे दर जाणून घेऊ शकतात.