पेट्रोलच्या किंमतीची शतकाच्या दिशेने वाटचाल

देशात १६ जून २०१७ पासून पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलत आहेत. रोजच्या या दर बदलानंतर पेट्रोलचे भाव मात्र एकतर्फी वाढतानाच दिसतायत. 

Updated: Sep 11, 2017, 09:44 PM IST
पेट्रोलच्या किंमतीची शतकाच्या दिशेने वाटचाल title=

नवी दिल्ली : देशात १६ जून २०१७ पासून पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलत आहेत. रोजच्या या दर बदलानंतर पेट्रोलचे भाव मात्र एकतर्फी वाढतानाच दिसतायत. 

मुंबईत सोमवारी पेट्रोलचे दर ७९.४१ इतके आहेत. ऑगस्ट २०१४ नंतर पेट्रोलचे हे सर्वाधिक दर आहेत. सोमवारी सकाळी ६ वाजल्यापासून लागू झालेल्या दरात पेट्रोलच्या किंमतीत १३ पैशांची वाढ झाली तर डिझेल २४ पैशांनी वाढले.

मुंबईसह दिल्लीत आज पेट्रोलचे भाव ७०.३०, कोलकातामध्ये ७३.०५ आणि चेन्नईत ७२.८७ इतके आहेत

पेट्रोल-डिझेलच्या दरात दररोज बदल करण्याच्या निर्णयानंतर गेल्या दोन महिन्यांत पेट्रोलच्या दरात प्रतिलीटर ७ रुपयांनी वाढ झालीये.