EPFO | या तारखेला तुमच्या PF अकाऊंटमध्ये येणार व्याजाचे पैसे; असा चेक करा बॅलन्स

EPFO: तुमचे पीएफ खाते असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. सूत्रांच्या माहितीनुसार लवकरच तुमच्या खात्यावर व्याजाची रक्कम येऊ शकते. तुमचे PF खात्याची रक्वम तपासा...

Updated: Apr 7, 2022, 03:29 PM IST
EPFO | या तारखेला तुमच्या PF अकाऊंटमध्ये येणार व्याजाचे पैसे; असा चेक करा बॅलन्स title=

मुंबई : EPFO: EPFO ने अलीकडेच आर्थिक वर्ष 2021-22 साठी पीएफवरील व्याजदर 0.40 टक्क्यांनी कमी करून 8.10 टक्के केला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, जुलैपर्यंत तुमच्या पीएफ खात्यात व्याजाचे पैसे येऊ शकतात. याआधी तुम्ही तुमच्या पीएफ खात्याची स्थिती तपासू शकता. जर तुम्हाला तुमच्या पीएफ खात्याची शिल्लक तपासायची असेल, तर तुम्ही खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करून तुमची शिल्लक (How to Check PF Account Balance) सहज तपासू शकता.

मिस्ड कॉलवरून माहिती मिळवा

PF खात्याशी लिंक केलेल्या रजिस्टर नंबरवरून 011-22901406 वर मिस्ड कॉल करा. तुम्हाला तुमच्या रजिस्टर नंबरवर एक संदेश येईल. ज्यामध्ये पीएफ शिल्लक माहिती उपलब्ध असेल.

sms ने शिल्लक तपासा

ईपीएफओकडे नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावरून 7738299899 वर EPFO ​​UAN LAN (भाषा) पाठवा. 
LAN म्हणजे तुमची भाषा. 
इंग्रजीत माहिती हवी असल्यास LAN ऐवजी ENG लिहावे लागेल. 
त्याचप्रमाणे हिंदीसाठी HIN आणि 
तमिळसाठी TAM लिहायचे आहे. 
हिंदीमध्ये माहिती मिळवण्यासाठी EPFOHO UAN HIN लिहून मेसेज करावा लागेल.

उमंग  Appद्वारे शिल्लक तपासा

उमंग Appद्वारे तुम्ही तुमची पीएफ शिल्लक तपासू शकता. उमंग Appमधील EPFO ​​वर क्लिक करा. यामध्ये Employee Centric Services वर क्लिक करा. त्यानंतर View Passbook वर क्लिक करा आणि UAN आणि पासवर्ड टाका. नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर OTP येईल. ते प्रविष्ट केल्यानंतर, तुम्ही ईपीएफ शिल्लक तपासू शकता.

आपण अधिकृत वेबसाइटवरून तपासा

तुमची PF शिल्लक ऑनलाइन तपासण्यासाठी, EPF पासबुक पोर्टलला भेट द्या. तुमचा UAN आणि पासवर्ड वापरून या पोर्टलवर लॉग इन करा. 
यामध्ये, Download/View Passbook वर क्लिक करा आणि त्यानंतर तुमच्यासमोर पासबुक उघडेल ज्यामध्ये तुम्ही शिल्लक पाहू शकता.