मुंबई : पीजी मेडिकल प्रवेशासाठी प्रवेशमर्यादा 15 पर्सेंटाईलने घटवावी असे निर्देश केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी दिलेत. रिक्त राहिलेल्या सर्व जागा भरण्यासाठी पर्सेंटाईल घटवण्यात येणार आहे.
देशभरात पीजी मेडिकलच्या सुमारे 8 हजार जागा रिक्त राहिल्या आहेत. या अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी नीट- पीजी परीक्षेत किमान 50 पर्सेंटाईल गुण मिळवणं आवश्यक आहे. पहिल्या दोन फे-यांनंतरही मोठ्या प्रमाणात जागा रिक्त आहेत.
पर्सेंटाईल घटवण्याचा निर्णय सर्व प्रवर्गांना लागू आहे. या निर्णयानुसार सामान्य प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी आता 35 पर्सेंटाईल, दिव्यांग खुल्या गटासाठी 30 पर्सेंटाईल, एसटी, ओबीसी प्रवर्गासाठी 25 पर्सेंटाईल लागणार आहे.