SBI News : आज रात्रीपासून एसबीआय अकाऊंट बंद? केंद्र सरकारनं दिली मोठी माहिती

State Bank of India: स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खातं असणाऱ्यांची संख्या कमी नाही. देशातील काही विश्वसनीय बँकांमध्ये ही बँक अग्रस्थानी येते. पण, आता या बँकेच्या या नव्या चर्चेनं अनेकांनाच घाम फोडला आहे.     

Updated: Feb 24, 2023, 11:34 AM IST
SBI News : आज रात्रीपासून एसबीआय अकाऊंट बंद? केंद्र सरकारनं दिली मोठी माहिती  title=
PIB Fact Check State Bank of India Account yono will be blocked

State Bank of India YONO Account : (Indian Banking System) भारतीय बँकिंग क्षेत्रात अतिशय महत्त्वपूर्ण बँकांमध्ये येणारं एक नाव म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया. अनेक खातेधारांना बँकिंग सुविधा पुरवण्यासोबत गुंतवणुकीचे (Investment) अनेक पर्यायही पुरवणाऱ्या या बँकेनं मोठा निर्णय घेतला आहे म्हणे. ज्यासंबंधीचा एक मेसेजही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या मेसेजनुसार खातेधारकांना त्यांचा (Pan Card) पॅन कार्ड क्रमांक अपडेट करण्यास सांगण्यात येत आहे. 

व्हायरल झालेला हा मेसेज SBI YONO Appशी संबंधित असून, त्यासोबत एक लिंकही देण्यात आली आहे. तुम्हालाही असा मेसेज आला असल्यास चिंतेत पडण्यापेक्षा आधी विचारांचं चक्र थांबवा. सतर्क व्हा आणि या मेसेजला रिप्लाय देऊ नका, त्यातील लिंकवरही क्लिक करु नका. 

फसवा मेसेज तुम्हाला संकटात आणू शकतो 

PIB Fact Check केल्यानंतर समोर आलेल्या माहितीनुसार हा मेसेज फसवा असल्याचं गुपित उघड झालं. बँकेकडून अद्यापही असा कोणताही मेसेज खातेधारकांना पाठवण्यात आलेला नाही. थोडक्यात हा मेसेज खातेधारकांची दिशाभूल करणारा आहे हे स्पष्ट होत आहे. बँकांकडून अशा कोणत्याही पद्धतीनं खातेधारकांशी संपर्क साधला जात नाही, असं सांगत सध्या केंद्रीय यंत्रणांनी नागरिकांना कोणासोबतही आपली खासगी माहिती शेअर न करण्याचा सल्ला दिला आहे. 

व्हायरल मेसेज तुम्हीही पाहा आणि सतर्क व्हा 

हा एक Text मेसेज आहे. जिथं तुम्ही एसबीआय खातेधारक असल्यास आजपासून तुमचं YONO अकाऊंट बंद होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. इतकंच नव्हे तर मेसेजमध्ये एक लिंकही असून, तिथं तुम्हाला PAN Number अपडेट करण्याची विचारणाही केली जात आहे. इथं लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे बँक कधीच ईमेल किंवा मेसेजच्या माध्यमातून तुमची खासगी माहिती मागत नाही. 

हेसुद्धा वाचा : Gold Price Today: सोने खरेदी करायचे आहे का? जाणून घ्या आजचा दर

 

परिणामी, केंद्र शासनाकडून नागरिकांनी अशा कोणत्याही मेसेजला उत्तर देऊ नये असा इशारा देण्यात आला आहे. PIB Fact Check कडून असे दावे करणारे सर्वच मेसेज फसवे असल्याचं म्हणत सरकारनं अशी कोणतीही विचारणा केली नसल्याचंही स्पष्ट केलं आहे.