नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) 'मन की बात'च्या ( Mann Ki Baat) ६०व्या एपिसोडमध्ये देशवासियांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. आपण सर्व २१व्या शतकाच्या तिसऱ्या दशकात प्रवेश करत असल्याचं सांगत नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या.
२०१९चे अनेक क्षण आपल्या सोबत आहेत. आता आपण केवळ नव्या वर्षात प्रवेश करत नाही तर एका नव्या दशकात प्रवेश करत आहोत. हे दशक भारताच्या तरुणाचं असेल. एकविसाव्या शतकात जन्मलेले लोक देशाच्या विकासाला गती देण्यासाठी सक्रिय भूमिका निभावतील, असं पंतप्रधान मोदींनी सांगितलं.
PM Modi in #MannKiBaat: I believe, the coming decade for India will not only be for development of youth but also development of nation driven by capabilities of youth. https://t.co/mOxo52uun7
— ANI (@ANI) December 29, 2019
PM Modi in #MannKiBaat: In the coming decade, young India will play a key role. Today's youth believes in the system and also has an opinion on a wide range of issues. I consider this to be a great thing. What today's youth dislikes is instability, chaos, nepotism. pic.twitter.com/NPKp9ASvO3
— ANI (@ANI) December 29, 2019
देशातील प्रत्येकाप्रमाणे मीदेखील २६ डिसेंबर रोजी सूर्यग्रहण पाहाण्यासाठी उत्सुक होतो. परंतु दिल्लीत ढगाळ वाचावरणामुळे मी पाहू शकलो नाही. पण मी कोझीकोड आणि भारताच्या इतर काही भागांमधून सूर्यग्रहणाची सुंदर छायाचित्रं लाईव्ह प्रक्षेपणाद्वारे पाहिली असल्याचं मोदी म्हणाले.
PM Modi in #MannKiBaat: Like everyone in the country, I also wanted to watch solar eclipse on December 26 but unfortunately it was not visible due to clouds in Delhi. However, we got to see beautiful pictures of solar eclipse from Kozhikode and some other parts of India. pic.twitter.com/A0qo0tcHPC
— ANI (@ANI) December 29, 2019
देशातील युवक अराजकतेचा द्वेष करत असल्याचंही मोदी म्हणाले. यावेळी बोलताना मोदींनी स्वामी विवेकानंद यांचादेखील उल्लेख केला. स्वामी विवेकानंद यांचा तरुण पिढीवर विश्वास असल्याचंही ते म्हणाले.