103 वर्षीय महिलेच्या चेहऱ्यावर मोदींमुळे फुलले हसू

103 वर्षीय महिलेने बांधली मोदींना राखी; 50 वर्षापूर्वी गमावला होता भाऊ

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Aug 7, 2017, 07:31 PM IST
103 वर्षीय महिलेच्या चेहऱ्यावर मोदींमुळे फुलले हसू title=
छायचित्र सौजन्य: पंतप्रधान कार्यालय ट्विटर

नवी दिल्ली :  वय वर्ष 103 असेल्या तिच्या आनंदाला आज (सोमवार, 7 जुलै) पारावार उरला नाही. गेली अनेक दशकं ती रक्षाबंधनाचा सण पाहात आली आहे. पण, आजच्यासारखा आनंद तिलाच नव्हे देशातील अत्यंत मोजक्याच स्त्रियांना मिळाला असेल. आजचे रक्षाबंधन तिच्या आयुष्यातील अविस्मरणीय ठरले. दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिच्याकडून राखी बांधून घेतली. तेही आपल्या घरी बोलवून. पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) ही माहिती दिल्यावर देशवासीयांनी या क्षणाचे प्रचंड स्वागत केले.

नाव शरबती देवी. वय वर्षे अवघी 103. शरबती देवीला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 7 आरसीआर या आपल्या निवासस्थानी बोलवले. तिच्या हातून राखी बांधून घेतली. पंतप्रधान कार्यालयाने हे छायाचित्र प्रसिद्ध केले. छायचित्र पाहताना शरबती देवींच्या चेहऱ्यावरचा आनंदच बरेच काही सांगून जातो. पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार 103 वर्षांची विधवा महिला शरबती देवीने पंतप्रधान निवासस्थानी येऊन मोदींना राखी बांधली.

शरबती देवीने 50 वर्षांपूर्वीच आपला भाऊ गमावला आहे. ती नेहमीच आपल्या भावाच्या आठवणीत हरवलेली असते. मात्र, रक्षाबंधनाच्या दिवशी हे दुख: अधिक टोकदार होते. या रक्षाबंधनावेळी मात्र तिने पंतप्रधानांनाच लिहीले. पंतप्रधानांना निरोप मिळताच त्यांनी शरबती देवी आणि त्यांच्या परिवाराल थेट आपल्या घरी बोलावले. शरबती देवी आणि त्यांचे कुटूंबिय निवासस्थानी आल्यावर मोदींनी त्यांच्याशी काही वेळ बोलणेही केले.

Smt. Sharbati Devi was extremely delighted to meet the PM & tie a Rakhi. They had a wonderful interaction today. pic.twitter.com/eBscaolvOG

— PMO India (@PMOIndia) August 7, 2017

दरम्यान, 103 वर्षांच्या शरबती देवी पंतप्रधानांना राखी बांधतानेचा क्षण कॅमेऱ्याने टिपला. पंतप्रधान कार्यालयाने लगोलग हे छायाचित्र सार्वजणीक केले. त्यानंतर देशवासीयांनीही या क्षणाचे स्वगत केले. दरम्यान, यापूर्वी पंतप्रधानांनी शाळेतील मुलांकडून राखी बांधून रक्षाबंधनाचा क्षण साजरा केला होता.