'परीक्षा पे चर्चा' कार्यकमाच्या सुरुवातीला मोदींची जॉर्ज फर्नांडिस यांना श्रद्धांजली

पंतप्रधान मोदींचा विद्यार्थ्यांसोबत संवाद

Updated: Jan 29, 2019, 12:11 PM IST
'परीक्षा पे चर्चा' कार्यकमाच्या सुरुवातीला मोदींची जॉर्ज फर्नांडिस यांना श्रद्धांजली title=

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी विद्यार्थ्यांसोबत संवाध साधला. परीक्षेची भीती कधी दूर करायची याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना काही टीप्स दिल्या. मोदींच्या या संवाधात नववी ते १२ आणि २५ वर्षापेक्षा कमी वयाच्या विद्यार्थी सहभागी झाले आहेत. दिल्लीच्या तालकाटोरा स्टेडियमवर 'परीक्षा पे चर्चा' या कार्यक्रमाच आयोजन केलं असून देशभरात अनेक शाळांमध्ये याचं लाईव्ह प्रक्षेपण होत आहे. या माध्यमातून देशभरातील लाखो विद्यार्थी मोदींच्या या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत.

परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाच्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडीस यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांनी म्हटलं की, 'ते एक जुंझार नेते होते आणि त्यांनी आणीबाणीमध्ये लोकशाहीच्या स्थापनेसाठी काम केलं होतं.'

मोदींनी म्हटलं की, मला कोणालाही काही उपदेश द्यायचा नाही. पण तुमच्या प्रमाणे काही वेळ जगू इच्छित आहे.' परीक्षेत जर अपयश आलं तर त्याचा सामना कसा करावा याबाबत संदेश देताना मोदींनी म्हटलं की, 'एक कवितेची ओळ मला आठवते की काही खेळण्या तुटल्य़ाने लहाणपण मरत नाही. तशाच प्रकार परीक्षेत थोडं फार मागे-पुढे झाल्यास आयुष्य थांबत नाही.'

पीएम मोदींनी म्हटलं की, जीवनात परीक्षा असणं गरजेचं आहे. यामुळे आपण आणखी मेहनत करतो. आपल्यामधील सर्वातम गोष्ट बाहेर येते. जर आपण स्वत:ला कोणत्याच आव्हानांच्या तराजुमध्ये मापणार नाही तर आयुष्यात अनेक गोष्टी थांबतील. जीवनाचा अर्थच असतो गती. जीवनाचा अर्थ असतो स्वप्न. जीवनाचा अर्थ असते जे काही हवं आहे ते मिळवण्यासाठी प्रयत्न करत राहणं.'