ब्रिक्स संमेलनात पाकिस्तानातील दहशतवादचा मुद्दा उचलणार पंतप्रधान मोदी

पंतप्रधान मोदी उचलणार दहशतवादाचा मुद्दा

Updated: Jul 2, 2018, 10:28 AM IST
ब्रिक्स संमेलनात पाकिस्तानातील दहशतवादचा मुद्दा उचलणार पंतप्रधान मोदी title=

मुंबई : दक्षिण आफ्रिकेमध्ये महिन्याच्या शेवटी ब्रिक्स संमेलनाचं आयोजन करण्यात येणार आहे. या संमेलनानला ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिकेचे नेते सहभागी होणार आहेत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील या संमेलनाला उपस्थित राहणार आहेत. याआधी मागील आठवड्यात  राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजीत डोभाल हे ब्रिक्स सुरक्षा बैठकीत सहभागी होण्यासाठी डरबनला गेले होते. यावेळी त्यांनी भारताची बाजू भक्कमपणे मांडत म्हटलं की, सीमे पलीकडून होत असलेला दहशतवाद रोखण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न नाही केले गेले. बैठकीत डोभाल यांनी म्हटलं की, 'या गोष्टीचा शोध घेतला पाहिजे की, दहशतवादाचा अड्डा चालवणाऱ्या देशांनी त्यांच्या धरतीवर दहशतवाद संपवण्यासाठी काही प्रयत्न केले आहेत का ?'

या संमेलनात पंतप्रधान मोदी सीमेपलीकडून पाकिस्तानकडून होणाऱ्या दहशतवादावर प्रहार करु शकतात. मागच्या वर्षी बिक्स संमेलनात भारताने त्यांच्या घोषणापत्रात दहशतवादासाठी पाकिस्तानातील समूह लश्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मद यांची नावं पुढे आणली होती. हे सगळं रशियाच्या मदतीने झालं होतं.

2016 मध्ये गोवामध्ये झालेल्या संमेलनात चीनचा विरोध असल्याने या समुहांची नावं घेता आली नव्हती. पण डिसेंबर 2017 मध्ये आरआयसी (रशिया, भारत, चीन) यांच्या संयुक्त समिती द्वारा हे घोषणापत्र बदलण्यात आलं आणि पण यामध्ये समुहांचं नाव न घेता फक्त आंतरराष्ट्रीय दहशतवाद आणि दहशतवादी संघटना यांच्याविरोधात पाऊल उचलण्याची चर्चा झाली होती.