मुंबई : दिवाळीच्या शुभमुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदी देहरादूनला पोहोचले आहेत. या सणाच्या निमित्ताने ते केदारनाथ या श्रद्धास्थानाला भेट देणार असून, ते सैन्यदलातील जवानांची भेट घेत त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करणार आहेत.
बुधवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास मोदी केदारनाथ मंदिर येथे पोहोचणार असून, तिथे श्रद्धासुमनं अर्पण केल्यानंचतर ते केदारपूरी येथे सुरु असणाऱ्या पुनर्बांधणीच्या कामांची पाहणीही करणार आहेत.
केदारधामला भेट दिल्यानंतर ते जवानांची भेट घेण्यासाठी जातील. त्यामुळे सध्या सैनिकांमध्येही उत्साह पाहायला मिळत आहे.
२०१४ मध्ये मोदींनी पंतप्रधानपदी निवड झाल्यानंतर पहिल्यांदाच सियाचीन येथे जवानांसोबत दिवाळी साजरी केली होती. ज्यानंतरच्या वर्षी त्यांनी पंजाब सीमेला भेट देत तेथे हा सण साजरा केला होता. २०१६ मध्ये त्यांनी हिमाचल प्रदेश गाठत इंडो- तिबेटीयन बॉर्डरला भेट दिली होती. तर, गेल्या वर्षी जम्मू-काश्मीर येथील सौनिकांची त्यांनी भेट घेतली होती.
Uttarakhand: Prime Minister Narendra Modi arrives in Dehradun; he will celebrate the festival of #Diwali in Kedarnath pic.twitter.com/rAhdGJg1Dd
— ANI (@ANI) November 7, 2018
मोदींनी गेल्या वर्षांमध्ये साजरा केलेली दिवाळी पाहता यंदाच्या वर्षी ते हा सण कसा साजरा करणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.