अटल बिहारी वाजपेयींच्या निधनानंतर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया

भारताचे माजी पंतप्रधान आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी यांचे गुरुवारी दिल्लीतील एम्स रुग्णालयात निधन झाले.

Updated: Aug 16, 2018, 06:16 PM IST
अटल बिहारी वाजपेयींच्या निधनानंतर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया title=

नवी दिल्ली :  भारताचे माजी पंतप्रधान आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी यांचे गुरुवारी दिल्लीतील एम्स रुग्णालयात निधन झाले. 5 वाजून 5 मिनिटांनी त्यांनी शेवटचा श्वास घेतला. वाजपेयी हे 93 वर्षांचे होते. अटल बिहारी वाजपेयींच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरवरून पहिली प्रतिक्रिया दिलेली आहे. मी नि:शब्द आहे, शून्यात आहे, माझ्या भावना दाटून आल्या आहेत. आमचं सगळ्यांचं श्रद्धास्थान अटलजी आता आमच्यात नाही. आयुष्याचा प्रत्येक क्षण त्यांनी राष्ट्रासाठी समर्पित केला. त्यांचं जाणं हे एका युगाचा अंत आहे.

याचबरोबर मोदींनी वाजपेयींची कविताही ट्विट केली.  'मौत की उमर क्या है? दो पल भी नहीं, ज़िन्दगी सिलसिला, आज कल की नहीं. मैं जी भर जिया, मैं मन से मरूं, लौटकर आऊँगा, कूच से क्यों डरूं?'

अटलजी आज आमच्यामध्ये नाहीत. पण त्यांची प्रेरणा, त्यांचं मार्गदर्शन प्रत्येक भारतीयाला प्रत्येक भाजप कार्यकर्त्याला नेहमीच मिळेल. इश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देओ आणि त्यांच्या स्नेह्यांना दु:ख सहन करण्याची शक्ती देओ. ओम शांती!, असं ट्विट मोदींनी केलं.