कोविड हल्ल्यापूर्वी धर्म, जात, भाषा पाहत नाही: पंतप्रधान मोदी

चीनमध्ये उदयास आलेल्या कोरोना सारख्या धोकादायक विषाणूने संपूर्ण जगात हाहा:कार माजवला आहे.

Updated: Apr 19, 2020, 08:54 PM IST
कोविड हल्ल्यापूर्वी धर्म, जात, भाषा पाहत नाही: पंतप्रधान मोदी title=

मुंबई : चीनमध्ये उदयास आलेल्या कोरोना सारख्या धोकादायक विषाणूने संपूर्ण जगात हाहा:कार माजवला आहे. आतापर्यंत असंख्य लोकांनी या व्हायरसमुळे आपले प्राण गमावले आहे. तर जगातील लाखो नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. देशात होणारा कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पाहता कोविड हल्ल्यापूर्वी वंश, धर्म, रंग, जाती, पंथ, भाषा किंवा सीमा यापैंकी काहीही पाहत नाही. असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरच्या माध्यमातून केलं आहे. 

'कोविड हल्ल्यापूर्वी वंश, धर्म, रंग, जाती, पंथ, भाषा किंवा सीमा यापैंकी काहीही पाहत नाही. त्यामुळे आपला प्रतिसाद बंधुता यांना प्राधान्य देणारं असावं.' असा संदेश त्यांनी नागरिकांना दिला आहे. कोरोना विषाणूचा फैलाव पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील लॉकडाऊनचा कालावधी वाढवला आहे. त्याचप्रमाणे सर्व नागरिकांना घरात राहण्याचे  आवाहन देखील केले आहे. 

सध्या भारतात कोरोना रुग्णांची संख्या १६ हजार ३६५ वर पोहोचली आहे. त्यापैकी २ हजार ४६६ रुग्ण कोरोनाच्या विळख्यातून बाहेर पडली आहेत, तर ५२१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच १३ हजार ३७८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.