पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनला जाणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनच्या दौऱ्यावर जाणार आहेत.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Mar 4, 2018, 12:03 PM IST
पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनला जाणार title=

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनच्या दौऱ्यावर जाणार आहेत.

संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न

चीनसोबत संबंध चांगले बनवण्यासाठी आणि पाकिस्तानला एकटं पाडण्यासाठी जूनमध्ये पंतप्रधान मोदी 'शांघाय कोऑपरेशन ऑर्गनाइजेशन' (एससीओ) बैठकीत भाग घेणार आहेत. पंतप्रधानांचा हा दौरा दोन्ही देशांसाठी महत्त्वाचा ठरु शकतो.

अनेक स्तरावर चर्चा

पीएम मोदींच्या या दौऱ्याआधी दोन्ही देशांचं प्रमुख अनेक स्तरावर चर्चा करतील. सगळ्यात आधी दोन्ही देशांचे तज्ज्ञ क्रॉसबॉर्डर नद्यांबाबतीत 26 ते 30 मार्च दरम्यान चर्चा करतील. या ४ दिवसांच्या बैठकीत दोन्ही देश एकदुसऱ्याच्या देशातून वाहणाऱ्या नद्यांबाबत अनेक गोष्टीबाबत चर्चा करतील.

या बैठकीनंतर एप्रिल 13 ते एप्रिल 15 च्या मध्ये चीनची नॅशनल डेव्हलेपमेंट अँड रिफॉर्म कमिशन भारताच्या नीती-आयोगासोबत स्ट्रॅटिजिक आणि आर्थिक स्तरावर चर्चा करतील. दोन्ही देशांमधील चर्चेचा हा सिलसिला हांगचोमध्ये 9 जूनला आयोजित SCO समिटमध्ये संपेल.