पंतप्रधान मोदी 10 डिसेंबरला करणार नवीन संसद भवनाचं भूमिपूजन

20 महिन्यांत नवं संसद तयार होण्याची अपेक्षा 

Updated: Dec 5, 2020, 06:44 PM IST
पंतप्रधान मोदी 10 डिसेंबरला करणार नवीन संसद भवनाचं भूमिपूजन title=

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 डिसेंबरला नवीन संसद भवनाच्या इमारतीचं भूमिपूजन करणार आहेत. शनिवारी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी याची पुष्टी केली.

ऑक्टोबर 2022 पर्यंत तयार होऊ शकतं

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले की, पंतप्रधान 10 डिसेंबर रोजी भूमिपूजन करतील, त्यानंतर नवीन संसद भवनाची पायाभरणी होईल. यानंतर 11 डिसेंबरपासून नवीन संसद भवनचे काम सुरू होईल. नवीन इमारत विशेष असेल. 20 महिन्यांत ही इमारत तयार होण्याची अपेक्षा आहे. भूमिपूजन होताच दुसऱ्या दिवसापासूनच बांधकामाला सुरवात होईल.

भूकंप प्रतिरोधक इमारत 

संसद भवनची नवीन रचना त्रिकोणी संकुलात असेल. इमारतील लायटिंग आणि रंग असे केले जाईल की तीन रंगांचे दिसतील. ऑक्टोबर 2022 पर्यंत नवीन संसदेच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. सुमारे 60 हजार चौरस मीटरमध्ये ही इमारत बांधली जाईल.

इमारतीत संयुक्त सत्र झालं तरी 1124 खासदारांच्या बसण्याची व्यवस्था केली जाईल. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सांगितले की, नवीन इमारत भूकंप प्रतिरोधक असेल. 2000 लोक थेट आणि 9000 लोक अप्रत्यक्षपणे त्याच्या बांधकामात सामील होतील.

888 आसन क्षमता

नवीन इमारतीत लोकसभा सदस्यांसाठी 888 जागांची व्यवस्था असेल. तर राज्यसभेच्या सभागृहात 326 जागांची क्षमता असेल. यात सर्व खासदारांसाठी स्वतंत्र कार्यालये असतील आणि ते अत्याधुनिक डिजिटल तंत्रज्ञानाने सज्ज असेल.

इमारतीबद्दल विशेष गोष्टी

नवीन संसद भवन बनवण्यासाठी 971 कोटी रुपये खर्च होणार आहे. 64,500 वर्गमीटरमध्ये याचं बांधकाम होईल. टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेडला या प्रकल्पाचे कंत्राट देण्यात आले आहे. एचसीपी डिझाईन प्लॅनिंग अँड मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेडने याचे डिझाइन तयार केले आहे.