गांधी घराण्याला नेहमीच गुजरातींचा आकस - मोदी

विधानसभा निवडणुका जाहीर झालेल्या नसल्या तरी गुजरातमध्ये जोरदार घमासान सुरू झालंय.

Updated: Oct 16, 2017, 08:48 PM IST
गांधी घराण्याला नेहमीच गुजरातींचा आकस - मोदी title=

सूरत : विधानसभा निवडणुका जाहीर झालेल्या नसल्या तरी गुजरातमध्ये जोरदार घमासान सुरू झालंय.

गुजरातच्या दौ-यात राहुल गांधींनी केलेल्या टीकेला पंतप्रधान मोदींनी गुजरात गौरव यात्रेच्या समारोपाच्या भाषणात उत्तर दिलं. काँग्रेस स्वपक्षीय गुजराती नेत्यांचाही नेहमी छळ केल्याचा आरोप मोदींनी केला. हा संघर्ष विकासवाद आणि वंशवादातला असल्याचा टोलाही त्यांनी काँग्रेसला लगावला आहे.

विशेष म्हणजे जीएसटीच्या मुद्यावर मोदींनी गुजरातीत भाषण करून गुजराती जनतेला साद घालण्याचा प्रयत्न केला.