नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून पाच दिवासाच्या स्वीडन आणि ब्रिटन दौऱ्यावर रवाना होणार आहेत. या दोन्ही दौऱ्यांमधून यजमान देशांनी भारताचे संबंध आणखी दृढ होतील असा विश्वास पंतप्रधानांनी रविवारी व्यक्त केला. व्यापार, प्रदुषणविरहित उर्जा, आणि गुंतवणूक या तिन प्रमुख विषयांवर स्वीडनमध्ये चर्चा होईल. शिवाय पंतप्रधान भारत- नॉर्डिक परिषेदेला संबोधित करतील.
त्याचप्रमाणे स्वीडनचे पंतप्रधान स्टीफन लोवेन यांच्याशी द्वीपक्षीय चर्चाही पंतप्रधानांच्या स्वीडन दौऱ्याचा प्रमुख भाग असेल. तर लंडनमध्ये कॉमनवेल्थ राष्ट्रप्रमुखांच्या गुरूवारी आणि शुक्रवारी होणाऱ्या बैठकीत पंतप्रधान सामील होतील.
लंडन दौऱ्यात भारत आणि फ्रान्सच्या पुढाकारनं तयार झालेल्या आंतरराष्ट्रीय सौरउर्जा संघटनेत ब्रिटन सामील होणार आहे. शिवाय पंतप्रधान मोदी आणि राणी एलिझाबेथ यांच्याही भेटीला जाणार आहेत.