पीएम मोदींनी व्यासपीठावरून घेतले नाव, तर भावुक झाले त्याचे गुरू

  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी हिमाचल प्रदेशात आपल्या मॅरथॉन निवडणूक अभियाना अंतर्गत ३ सभांना संबोधित केले. 

Updated: Nov 7, 2017, 09:39 AM IST
 पीएम मोदींनी व्यासपीठावरून घेतले नाव, तर भावुक झाले त्याचे गुरू title=

कुल्लू :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी हिमाचल प्रदेशात आपल्या मॅरथॉन निवडणूक अभियाना अंतर्गत ३ सभांना संबोधित केले. 

कुल्लूमध्ये आपल्या तिसऱ्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला पॅराग्लायडिंगचा अनुभव शेअर केला. आपला भाषणात त्यांना पॅराग्लायडिंग शिकविणाऱ्या रोशन ठाकूर यांचे नावाचा उल्लेख केला. यावेळी या सभेत रोशन ठाकूरही उपस्थित होते.

पंतप्रधानांनी आपले नाव घेतले हे ऐकून रोशन भावुक झाले. मोदी म्हणाले, मला अॅडव्हेंचर स्पोर्ट्स खूप आकर्षित करतता. मी जेव्हा हिमाचलमध्ये येतो तेवव्हा अॅडव्हेंचर स्पोर्ट्स करणे पसंत करतो. त्यावेळी त्यांनी त्यांचे अॅडव्हेंचर स्पोर्ट्सचे गुरू रोशन यांच्या नावाचा उल्लेख केला. 

कुल्लू जिल्ह्यातील मनालीच्या बरुआ गावात एका शेतकऱ्याचा मुलगा असलेला रोशनकडे कमर्शियल पॅराग्लायडिंगचे लायसन्स आहे. रोशन या ठिकाणी पॅराग्लायडिंगचे प्रशिक्षण केंद्र चालवतात.  यात निमलष्करी दल आणि इतरांना तो ग्लायडिंगचे धडे देतो. 

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या बातमीनुसार रोशन याने पंतप्रधानांशी झालेल्या भेटीबद्दल भरभरून बोलत होता. मला गर्व आहे की माझे नाव त्यांना अजूनही आठवते. त्यांनी माझे नाव घेतले, तेव्हा मी त्यांना हात दाखवू इच्छित होतो. पण स्टेजपासून दूर होतो. माझ्याकडे त्यांच्या पॅराग्लायडिंगचे फोटो आहे. 

रोशन म्हटला की, पंतप्रधान मोदी सर्वात प्रथम १९९६मध्ये आले होते. त्यानंतर त्यांनी पहिल्यांदा १९९७ मध्ये सोलंग व्हॅलीत पॅराग्लायडिंग केली होती. मोदींना पॅराग्लायडिंग करणे खूप आवडते. २००० मध्येही ते माझ्याकडे आलो होते. त्यानंतर २००१ मध्ये गुजराते मुख्यमंत्री बनल्यानंतर ते तीन वेळा सोलंग व्हॅलीत आले होते.