PM Narendra Modi Live : तिसरी लाट थोपवण्यासाठी मोदींचा '4 T' फॉर्म्युला

महाराष्ट्र, केरळमधील कोरोनाचा वाढता आकडा चिंताजनक 

Updated: Jul 16, 2021, 12:49 PM IST
PM Narendra Modi Live : तिसरी लाट थोपवण्यासाठी मोदींचा '4 T' फॉर्म्युला  title=

मुंबई : देशभरात पुन्हा एकदा कोरोनाच्या तिसऱ्या लाटेने डोकंवर केलंय. 111 देशांमध्ये आतापर्यंत कोरोनाच्या तिसऱ्या लाटेने प्रवेश केला आहे. कोरोनाचा डेल्टा वेरिएंट हा सर्वाधिक धोकादायक असल्याचा इशारा WHO ने दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज अनेक राज्यातील मुख्यमंत्र्यासोबत बैठक घेतली. (PM Narendra Modi shared 4 T formula to stop Corona Virus Third Waves, Maharashtra Corona Count dangerous ) पंतप्रधानांच्या या बैठकीत तामिळनाडू, ओडिसा, आंध्रपरदेश, कर्नाटक, महाराष्ट्र या राज्यांचे मुख्यमंत्री सहभागी होते. महाराष्ट्र आणि केरळमधील रूग्णांचा वाढता आकडा चिंताजनक आहे. तिसऱ्या लाटेला थोपवण्यासाठी आपण सतर्क राहिलं पाहिजे, असं यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. 

पंतप्रधान मोदींनी गेल्या आठवड्यात याच सहा राज्यातून 80 टक्के कोरोनाबाधितांचे रूग्ण सर्वाधिक असल्याचे समोर आले आहे. महाराष्ट्र, केरळ यांच्या राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा चिंताजनक असल्याचं पंतप्रधान म्हणाले. आपल्याला पुन्हा एकदा टेस्ट, ट्रॅक आणि टीका याच्या 'चार टी' रणनीतिवर पुढे जावं लागणार आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बैठकीतील महत्वाची मोदी 

जिथे रुग्ण वाढतायत तिथे पावलं उचलणे आवश्यक आहे. 
महाराष्ट्र आणि केरळमध्ये स्थिती म्हणावी तितकी सुधारलेली नाही
दीर्घकाळात केसेस वाढत राहिल्या तर म्युटेशन  वाढते
या दृष्टानं रणनीती तीच आहे. त्याचा अनुभवही आहे
मायक्रो कंटनेमेंट झोनच्या कठोर अंमलबाजणीनं चांगला अनुभव आला आहे
लसीकरण हे प्रभावी उपाय आहे. 
अनेक राज्य आरटीपीसीआर टेस्टिंगच्या क्षमता वाढण्य़ासाठी प्रयत्न करतायत, हे चांगल आहे
केंद्र सरकारनं २३ हजार कोटींचं एक हेल्थ पॅकेज जाहीर केले आहे
ग्रामीण भागावर आरोग्य सुविधांवर लक्ष केंद्रीत करणे आवश्यक आहे
मिशन मोडमध्ये अधिकारी नेमून पंधरा ते २० दिवसात पीएसए ऑक्सिजन प्लाँटचं काम पूर्ण करा
युरोपातील देशांमध्ये गेल्या तीन आठवड्यात रुग्णसंख्या पुन्हा एकदा झपाट्यानं वाढू लागली आहे. 
तशीच स्थिती आपल्याकडे येणार नाही याची काळजी सगळ्यांनी घेणे गरजेचे आहे
महाराष्ट्र, केरळमधील कोरोनाचा वाढता आकडा चिंताजनक आहे.