पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली कोविड लस

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी एम्स रूग्णालयात (AIIMS) कोविड लस (COVID19 vaccine) टोचून घेतली आहे. 

Updated: Mar 1, 2021, 07:40 AM IST
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली कोविड लस   title=
Pic Courtesy: ANI

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी एम्स रूग्णालयात (AIIMS) कोविड लस (COVID19 vaccine) टोचून घेतली आहे. यावेळी मोदी यांनी सर्व लाभार्थ्यांनी लस घ्यावी, असे आवाहन केले. आपण पहिला डोस घेतला आहे. कोविड-19 विरुद्धच्या जागतिक लढाईला बळकट करण्यासाठी आमच्या डॉक्टर आणि वैज्ञानिकांनी चांगले कार्य केले आहे. हे त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे. कोविड लस घेण्यास पात्र असलेल्या सर्वांना मी आवाहन करत आहे. एकत्रितपणे आपण भारत कोविड-19 मुक्त करुया. (PM Narendra Modi Took first dose of the COVID19 vaccine at AIIMS)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कोरोना व्हायरस लसीचा पहिला डोस घेतला. त्यांनी स्वत: ट्विट करुन ही माहिती दिली आहे. दरम्यान, 1 मार्चपासून कोरोना लसीकरण मोहिमेचा दुसरा टप्पा सुरू केला जात आहे आणि याअंतर्गत आता 60 वर्षाखालील लोकांना लस डोस दिला जाईल. या व्यतिरिक्त ज्यांचे वय 45 वर्षे आहे अशा लोकांना देखील लसीकरण केले जाईल ज्यांना आधीच मोठा आजार आहे.

कोरोना लसीकरणाचा दुसऱ्या टप्प्यात सरकारी रुग्णालयांसह निवडक खासगी रुग्णालयांमध्येही कोरोनाची लस मिळणार आहे. 60 वर्षे वयाच्या वरच्या ज्येष्ठ नागरिकांना आणि 45 वर्षांवरच्या काही सहआजार असणाऱ्यांना सरकारी रुग्णालयात मोफत लस मिळणार आहे. तर खासगी रुग्णालयांमध्ये पैसे देऊन ही लस घेता येणार आहे. खासगी रुग्णालयांमध्ये लसीसाठी 250 रुपये निश्चित करण्यात आलेत.