पंतप्रधानांची मुख्यंमंत्र्यांसोबत बैठक, या ८ मुद्द्यांवर होऊ शकते चर्चा

येणाऱ्या काळात लॉकडाऊन संदर्भात महत्वाचे निर्णय होण्याची शक्यता 

Updated: May 11, 2020, 10:10 AM IST
पंतप्रधानांची मुख्यंमंत्र्यांसोबत बैठक, या ८ मुद्द्यांवर होऊ शकते चर्चा  title=

नवी दिल्ली : कोरोना संकट काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी विविध राज्यांच्या मुख्यंमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. आज दुपारी ३ वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही चर्चा होणार आहे. या बैठकीत १७ मे नंतरची रणनिती आणि लॉकडाऊनमध्ये दिल्या गेलेल्या सवलतीवर चर्चा होऊ शकते. तसचे येणाऱ्या काळात लॉकडाऊन संदर्भात महत्वाचे निर्णय होऊ शकतात. 

या ८ मुद्द्यांवर संभाव्य चर्चा 

१) १७ मे नंतर लॉकडाऊन वाढवला पाहीजे की नाही ? 

२) अर्थव्यवस्थेला कशाप्रकारे रुळावर आणता येईल

३) लॉकडाऊन दरम्यान देण्यात आलेल्या सवलतींचा काय परिणाम होईल ?

४) आर्थिक व्यवहार जास्तीत जास्त कसे वाढतील ? 

५) मजुरांचे घरी परतणं अधिकं सोपं कसं होईल ?

६) वाढता प्रादुर्भाव कसा रोखता येईल ? यासाठी अधिक कठोर होण्याची गरज आहे का ?

७) कोरोनाशी संबंधित अद्ययावत मेडिकल सुविधा 

८) गोरगरीबांच्या खात्यात देण्यात येणाऱ्या आर्थिक पॅकेजवर चर्चा 

पंतप्रधान मोदी यांची कोरोना विषयावर मुख्यमंत्र्यांसोबतची ही पाचवी बैठक आहे. याआधी २० मार्चला बैठक झाली होती. 

२० मार्च, २ एप्रिल, ११ एप्रिल, २७ एप्रिल आणि आज दुपारी ३ वाजता पाचवी बैठक असणार आहे.