मुलीच्या मृतदेहाला मिठी मारणाऱ्या वडिलांना, पोलिसाने फूटबॉलसारखी लाथ मारली

एक मुलीचा बाप शोकसागरात बुडालाय. कारण तेलंगणातील या कथित घटनेत त्यांच्या 16 वर्षाच्या 

Updated: Feb 27, 2020, 06:38 PM IST
मुलीच्या मृतदेहाला मिठी मारणाऱ्या वडिलांना, पोलिसाने फूटबॉलसारखी लाथ मारली

संघारेड्डी : एका मुलीचे वडील  शोकसागरात बुडाले आहेत. कारण  एका कथित घटनेत त्यांच्या 16 वर्षाच्या मुलीने आत्महत्या केली आहे. या मुलीच्या बाबाने फ्रिझरमध्ये ठेवलेल्या मृतदेहाला बाहेरून जखडून ठेवलं आहे. पोलिसांना हा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी घेऊन जायचा आहे, पण मुलीचे बाबा हटायला तयार नव्हते. 

तेव्हा पोलिसाच्या दुप्पट वयाच्या मुलीच्या वडीलांना, एका पोलिसाने अगदी फूटबॉलला मारतात, तशी लाथ मारली आणि नंतर फरफटत नेलं आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची मोठी अडचण झाली आहे. तेलंगणातील संघारेड्डी जिल्ह्यातील ही घटना आहे.

पोलिसांवर मुलीच्या वडिलांशी गैरवर्तन केल्याचा आरोप होत आहे, तर दुसरीकडे पोलिसांनी म्हटलं आहे की, या मुलीचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी घेऊन जाणं आवश्यक होतं. पण मुलीच्या वडीलांनी त्यांना ताटकळत ठेवलं होतं. 

याआधी काही लोकांनी शवगृहाची काच फोडली होती, हा मृतदेह ते घेऊन जाण्याच्या उद्देशात होते, या मुलीच्या वडीलांनी मृतदेह सोडण्यास नकार दिल्यानंतर ही घटना घडली. हा मृतदेह कॉलेज होस्टेलला घेऊन जाण्याचा उद्देश होता, तिथे या मुलीचे कुटूंबीय धरणे आंदोलन करणार होते.

एस चंद्रशेखर यांची 16 वर्षाची मुलगी संध्या राणीने 26 फेब्रुवारी रोजी आत्महत्या केल्याचं सांगण्यात येत आहे. अकरावीतल्या मुलीची उपेक्षा झाली आणि कॉलेजच्या बेजाबदारपणामुळे हे झालं, कारण मुलीची प्रकृती गंभीर आहे, तिला बरं नाही याची दखल कॉलेजने घेतली नसल्याचा आरोप पालकांनी केला आहे.