मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाजवळ सेल्फी काढल्यास होणार कारवाई

मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या कालिदास मार्गावरील उत्तर प्रदेश पोलिसांनी लावलेला सूचनेचे पोस्टर सध्या चर्चेचा विषय ठरलेय.

archana harmalkar अर्चना हरमलकर | Updated: Dec 21, 2017, 01:24 PM IST
मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाजवळ सेल्फी काढल्यास होणार कारवाई title=

लखनऊ : मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या कालिदास मार्गावरील उत्तर प्रदेश पोलिसांनी लावलेला सूचनेचे पोस्टर सध्या चर्चेचा विषय ठरलेय.

येथे पोलिसांनी एक सूचना देणारा फलक लावलाय. या फलकावर या व्हीआयपी भागातमध्ये फोटो वा सेल्फी काढणे मनाई असे. नियमाचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई होईल. ५ कालिदास मार्ग लखनऊमधील व्हिआयपी भाग आहे. येथे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या निवासस्थानासह अनेक मंत्र्यांचे निवासस्थान आहेत. 

व्हीआयपी भाग असल्याने येथील परिसर नेहमीच स्वच्छ आणि सुंदर असतो. अनेक जण येथे भेट देण्यास येतात. यावेळी फोटो अथवा सेल्फी काढले जातात. मात्र आता या ठिकाणी फोटो वा सेल्फी काढण्यासाठी मनाई करण्यात आलीये.

हा सूचनेचा फलक सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलाच आहे मात्र त्याबरोबर विरोधकांनीही यावरुन सरकारला चिमटे काढलेत. माजी मुख्यमंत्री अखिलेश यादवनी याबाबत ट्विट करताना म्हटलेय, नव्या वर्षात जनतेला उत्तर प्रदेश सरकारकडून गिफ्ट, सेल्फी घेतल्यास लागू शकतो यूपीकोका!