मध्य प्रदेशात राजकीय संकट : काँग्रेसने राजस्थान तर भाजपने दिल्लीत आमदार हलविले

मध्य प्रदेशात राजकीय संकट अधिक गडद झाले आहे.  

Updated: Mar 11, 2020, 08:09 AM IST
मध्य प्रदेशात राजकीय संकट : काँग्रेसने राजस्थान तर भाजपने दिल्लीत आमदार हलविले title=
संग्रहित छाया

भोपाळ : मध्य प्रदेशात राजकीय संकट अधिक गडद झाले आहे. काँग्रेस नेते आणि माजी मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी बंडाचे निशाण फडकविल्यानंतर त्यांच्या समर्थक २२ आमदारांनी राजीनामा देत मुख्यमंत्री कमलनाथ सरकारला दे धक्का दिला. त्यामुळे काँग्रेसचे सरकार अल्पमतात आले आहे. दरम्यान, सरकार सुरक्षित आहे. कोणताही धोका नाही, असे काँग्रेसकडून सांगण्यात येत आहे. खबरदारी म्हणून काँग्रेस आमदारांना जयपूरला हलवणार आहे. सकाळी ९ वा. विशेष विमानाने जयपूरला नेणार आहे. दरम्यान, भाजपनेही आपल्या आमदारांना दिल्लीत हलविले आहे.

आज सकाळी ८८ काँग्रेसचे, ४ अपक्ष आमदार जयपूर येथे रवाना होणार आहे. ब्यूना विस्ता रिसॉर्टमध्ये काँग्रेस आमदारांना ठेवण्यात येणार आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे आमदारही याच हॉटेलमध्ये थांबले होते. आमेरच्या कुंडामध्ये ब्यूना विस्ता रिसॉर्ट आहे. राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांनी मोर्चा सांभाळला आहे.

मुख्यमंत्री कमलनाथ यांचं सरकार संकटात सापडले आहे. सध्या काँग्रेसकडून बहुमत सिद्ध करणार असल्याचा दावा केला जात असला, तरी भाजप सर्तक झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाच्या निवडणूक समितीची बैठक पार पडली. त्यानंतर भाजपने आपल्या आमदारांना दिल्लीला हलविले आहे.  

0