पोस्टाच्या सेविंग अकाऊंटवर ७००० रुपयांपर्यंतची कर सवलत, जाणून घ्या संपूर्ण स्किम

पोस्टात बचत खाते उघडल्यानंतर आर्थिक फायदा तर मिळतो पण त्यासोबतच करातही सूट 

Updated: Jul 9, 2021, 02:37 PM IST
पोस्टाच्या सेविंग अकाऊंटवर ७००० रुपयांपर्यंतची कर सवलत, जाणून घ्या संपूर्ण स्किम  title=

मुंबई : सुरक्षा आणि उत्तम रिटर्न्स करता अनेकदा सामान्य माणूस पोस्ट ऑफिसमध्ये खातं खोलतात. आता पोस्टात बचत खाते असणाऱ्यांसाठी अधिकच फायदा होणार आहे. कारण यामध्ये तुम्हाला सर्वाधिक टॅक्सवर सूट मिळणार आहे. जर कुणाचं सिंगल अकाऊंट असेल तर यावर आर्थिक वर्षात 3500 रुपयांपर्यंत मिळणारे व्याज हे करमुक्त असेल. तर जॉईंट अकाऊंटवर तब्बल 7 हजार रुपयांपर्यंत व्याज हे करमुक्त आहे. 

पोस्टाच्या बचत खात्यावर जवळपास 4% व्याज दर मिळू शकते. देशातील सर्वात मोठी बँक, भारतीय स्टेट बँकच्या बचत खात्यावर व्याज दर महिन्याता 2.7% आहे. यामुळे पोस्टात अकाऊंट असलेल्या व्यक्तींना मोठा फायदा होणार आहे. पोस्टात खाते उघडणाऱ्यांना आकर्षक आणि ज्यादा व्याजदरासह आयकरातही सूट मिळते.

पोस्टातील 'स्मॉल सेविंग स्कीम' हा किरकोळ गुंतवणूकदारांमध्ये सर्वाधिक पसंतीचा पर्याय मानला जातो. या योजनेत तुम्हाला सर्वात जास्त व्याजदर मिळतो. पोस्ट ऑफिस बचत खात्यांसह छोट्या बचत योजनांवरील व्याजदर हा दर तिमाहीनंतर बदलला जातो. दरम्यान जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत सरकारने छोट्या बचत योजनांवरील व्याज दरामध्ये कोणताही बदल केलेला नाही.

पोस्टातील 'सेव्हिंग अकाउंट' मध्ये किमान 500 रुपये जमा करुन अकाऊंट उघडता येते. पोस्टात सेव्हिंग्ज अकाउंटवरील व्याज दर हा दर महिन्याच्या 10 तारखेदरम्यान किंवा महिन्याच्या शेवटच्या दिवशी जमा होतो. यातून देखभाल शुल्क म्हणून 100 वजा केले जातात. जर खात्यातील शिल्लक शून्य झाली तर ते खाते आपोआप बंद करण्यात येते.

वित्त मंत्रालयाने 9 एप्रिल 2021 रोजी पोस्ट ऑफिसमधील बचत बँक खात्याबाबत अधिसूचना जारी केली होती. यात कोणकोणत्या व्यक्ती झिरो बॅलन्स अकाऊंट सुरु करु शकतात, याबाबतची माहिती देण्यात आली होती