मुंबई : जर तुम्ही पोस्ट ऑफिस आरडी स्कीममध्ये 10 वर्षांसाठी दरमहा 10 हजार रुपये गुंतवले तर 10 वर्षांनंतर तुम्हाला 5.8% दराने 16 लाखांपेक्षा जास्त रुपये मिळू शकतात.
Post Office Scheme: कोणत्याही गुंतवणुकीत जोखीम असतेच. तुम्ही अशा ठिकाणी गुंतवणूक करण्याला नेहमी प्राधान्य देता. तसेच त्या गुंतवणुकीतून समाधानकारक परतावा मिळवू इच्छिता. इक्विटी मार्केटमध्ये मोठा परतावा मिळू शकतो परंतू जोखीम जास्त असल्याने अनेक गुंतवणूकदार त्याकडे पाठ दाखवतात. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला सुरक्षित गुंतवणूक हवी असेल जिथे चांगला परतावाही मिळेल, तर पोस्ट ऑफिसच्या योजना तुमच्यासाठी चांगला पर्याय आहे.
पोस्ट ऑफिसच्या छोट्या बचत योजना तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय असू शकतात. यामध्ये रिस्क फॅक्टरही कमी आहे आणि त्याच वेळी रिटर्नही चांगला मिळतो. पोस्ट ऑफिस Recurring Deposit हा त्यापैकी एक गुंतवणुकीचा मार्ग आहे.
पोस्ट ऑफिस Recurring Deposit खाते ही गुंतवणूकीसाठी चांगली योजना आहे. या गुंतवणुकीत सरकारी सुरक्षेची हमी असते. यामध्ये तुम्ही फक्त 100 रुपयांच्या छोट्या रकमेसह गुंतवणूक सुरू करू शकता. गुंतवणुकीची कमाल मर्यादा नाही, तुम्ही त्यात हवे तेवढे पैसे टाकू शकता.
या योजनेचे खाते पाच वर्षांसाठी उघडले जाते. बँका सहा महिने, 1 वर्ष, 2 वर्षे, 3 वर्षांसाठी आवर्ती ठेव खात्यांची सुविधा देतात. त्यात जमा केलेल्या पैशावर प्रत्येक तिमाहीत (वार्षिक दराने) व्याज मोजले जाते आणि प्रत्येक तिमाहीच्या शेवटी ते तुमच्या खात्यात (चक्रवाढ व्याजासह) जमा होते.
आवर्ती ठेव योजनेवर 5.8% व्याज उपलब्ध आहे, हा नवीन दर 1 एप्रिल 2020 पासून लागू होईल. भारत सरकार प्रत्येक तिमाहीत आपल्या सर्व लहान बचत योजनांचे व्याजदर निश्चित करते.
जर तुम्ही पोस्ट ऑफिस आरडी स्कीममध्ये 10 वर्षांसाठी दरमहा 10 हजार रुपये गुंतवले तर 10 वर्षांनंतर तुम्हाला 5.8% दराने 16 लाखांपेक्षा जास्त रुपये मिळतील.
तुम्हाला खात्यात नियमित पैसे जमा करत राहावे लागेल, जर तुम्ही पैसे जमा केले नाहीत तर तुम्हाला दरमहा एक टक्का दंड भरावा लागेल. 4 हप्ते चुकल्यानंतर तुमचे खाते बंद केले जाते.
Recurring Depositमधील गुंतवणुकीवर TDS कापला जातो, जर ठेव रु. 40,000 पेक्षा जास्त असेल तर 10% प्रतिवर्ष दराने कर आकारला जातो.
RD वर मिळालेले व्याज देखील करपात्र आहे, परंतु संपूर्ण मॅच्युरिटी रकमेवर कर आकारला जात नाही. ज्या गुंतवणूकदारांना कोणतेही करपात्र उत्पन्न नाही ते FD प्रमाणेच फॉर्म 15G भरून TDS सूटचा दावा करू शकतात.