मुंबई : Post Office Scheme: सामान्यत: कोणत्याही गुंतवणुकीसाठी जोखीमही असते. ज्या ठिकाणी पैसे सुरक्षित असतील तेथे सुरक्षित गुंतवणूक करावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. तसेच, कमी जोखमीसह चांगला परतावा मिळवा, असे वाटते. इक्विटी मार्केटमध्ये जोखीम जास्त असल्याने परतावा इतर गुंतवणूक उत्पादनांपेक्षा जास्त असतो. पण प्रत्येकात जोखीम घेण्याची क्षमता नसते. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल जिथे नफा असेल आणि कोणताही धोका नसेल तर पोस्ट ऑफिस तुमच्यासाठी चांगले आहे.
जर तुम्हीदेखील अशा लोकांपैकी आहात ज्यांना जोखीम घ्यायची नाही तर पोस्ट ऑफिसच्या छोट्या बचत योजना तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय असू शकतात. आम्ही तुम्हाला अशी गुंतवणूक सांगू ज्यामध्ये जोखीम नगण्य आहे आणि परतावा देखील चांगला आहे. पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट (Post Office Recurring Deposit) हे त्यापैकी एक गुंतवणूक मार्ग आहे.
पोस्ट ऑफिस RD डिपॉझिट अकाउंट ही लहान हप्ते चांगल्या व्याजदराने जमा करण्याची सरकारी हमी योजना आहे. यामध्ये तुम्ही फक्त 100 रुपयांच्या छोट्या रकमेने गुंतवणूक सुरू करू शकता. यात कोणतीही जास्तीत जास्त गुंतवणूक मर्यादा नाही, तुम्हाला पाहिजे तेवढे पैसे तुम्ही गुंतवू शकता.
या योजनेचे खाते पाच वर्षांसाठी उघडले जाते. तथापि, बँका सहा महिने, 1 वर्ष, 2 वर्षे, 3 वर्षे आवर्ती ठेव खात्यांची सुविधा देतात. जमा केलेल्या पैशांवर प्रत्येक तिमाहीत (वार्षिक दराने) व्याज मोजले जाते आणि ते प्रत्येक तिमाहीच्या शेवटी तुमच्या खात्यात (चक्रवाढ व्याजासह) जोडले जाते.
सध्या, आवर्ती ठेव योजनेवर 5.8 टक्के व्याज उपलब्ध आहे, हा नवीन दर 1 एप्रिल 2020 पासून लागू आहे. भारत सरकार प्रत्येक तिमाहीत आपल्या सर्व लहान बचत योजनांचे व्याज दर निश्चित करते.
तुम्ही दरमहा 10 हजार ठेवले तर तुम्हाला 16 लाख मिळतील. जर तुम्ही पोस्ट ऑफिस आरडी स्कीममध्ये 10 वर्षांसाठी दरमहा 10 हजार रुपये गुंतवले तर 10 वर्षांनंतर तुम्हाला 5.8 टक्के दराने 16 लाख रुपयांपेक्षा जास्त मिळतील.
प्रत्येक महिन्यात गुंतवणूक 10,000 रुपये
व्याज 5.8%
मुदतपूर्ण 10 वर्ष
10 वर्षानंतर मुदतपूर्ण मिळणारी रक्कम = 16,28,963 रुपये
RD खात्याबद्दल महत्वाच्या गोष्टी
तुम्हाला खात्यात नियमितपणे पैसे जमा करत राहावे लागेल, जर तुम्ही पैसे जमा केले नाही तर तुम्हाला दरमहा एक टक्के दंड भरावा लागेल. 4 हप्ते चुकवल्यानंतर तुमचे खाते बंद होते.
आवर्ती ठेवींच्या गुंतवणुकीवर टीडीएस कापला जातो, जर ठेवी 40,000 रुपयांपेक्षा जास्त असेल तर वार्षिक 10 टक्के दराने कर आकारला जातो. RD वर मिळणारे व्याज देखील करपात्र आहे, परंतु संपूर्ण परिपक्वता रकमेवर कर आकारला जात नाही. ज्या गुंतवणूकदारांकडे कोणतेही करपात्र उत्पन्न नाही ते फॉर्म 15G दाखल करून टीडीएस सूटबाबत दावा करू शकतात, जसे FD च्या बाबतीत आहे.
पोस्ट ऑफिस व्यतिरिक्त, सरकारी आणि खासगी बँकादेखील आवर्ती ठेवीची सुविधा पुरवतात.
बँकांच्या आवर्ती ठेवी
बँक RD चा दर कालवधी
Yes Bank 7.00% 12 महीने ते 33 महीने
HDFC Bank 5.50% 90/120 महीने
Axis Bank 5.50% 5 वर्ष ते 10 वर्ष
SBI Bank 5.40% 5 वर्ष ते 10 वर्ष