Budget 2023 च्या आधी पंतप्रधानांची 'ही' योजना तुम्ही पाहिलीत का? वाचा कसा होईल फायदा...

Budget 2023: येत्या काळात जागतिक मंदीचं (recession) वारं अनेकांना सतावतं आहेत त्यातून आपल्या देशातही महागाईचा दर कैक पटीनं वाढला आहे. ही महागाई (Inflation) कमी करण्यासाठी सध्या आरबीआयनं चांगलीच कंबर कसली आहे

Updated: Dec 17, 2022, 02:41 PM IST
Budget 2023 च्या आधी पंतप्रधानांची 'ही' योजना तुम्ही पाहिलीत का? वाचा कसा होईल फायदा...   title=
File Photo

PPF Investment: येत्या काळात जागतिक मंदीचं (recession) वारं अनेकांना सतावतं आहेत त्यातून आपल्या देशातही महागाईचा दर कैक पटीनं वाढला आहे. ही महागाई (Inflation) कमी करण्यासाठी सध्या आरबीआयनं (RBI) चांगलीच कंबर कसली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियानं रेपा रेटमध्ये वारंवार वाढ केली आहे. त्यामुळे बॅंकांनी आपलं व्याजदर वाढवलं आहे. त्यामुळे लोकांना आपलं EMI सुद्धा जास्त प्रमाणात बॅंकांना द्यावं लागणार आहे. अशा परिस्थिती मागच्या दोन आठवड्यापुर्वी आरबीआयनं रेपो रेट मध्ये (Repa Rate) 0.35 टक्क्यांनी वाढ केली आहे. यंदा ही महागाई आटोक्यात येण्याच्या दिशेनं पाऊलं चालवली जात असताना आता महागाई आटोक्यात येण्याची शक्यता आहे. (ppf investment invest in central governments publi provident scheme and get tax benefits and returns)

आता काहीच दिवसांनी आपण 2022 या वर्षाला निरोप देणार आहोत आणि नव्या वर्षात पदार्पण करणार आहोत. पुढच्या वर्षी पहिली आणि महत्त्वाची घडामोड असेल ती म्हणजे युनिन बजेट 2023. सध्या आपल्या सर्वांसाठी हे बजेट फार महत्त्वाचे असणार आहे. परंतु त्याआधी तुम्ही पंतप्रधानांची (Prime Minister PPF Investment Scheme) ही स्किम जाणून घेतली पाहिजे. ही स्किम आहे पीपीएफ इन्वेस्टमेंटची. पीपीएफ म्हणजे पब्लिक प्रोविडंट फंड इनव्हेसमेंट. या इन्व्हेसमेंटमधून तुम्ही अगदी 500 रूपयांपासून गुंतवणूक करू शकता आणि या गुंतवणूकीतून तुम्हाला जबरदस्त फायदा मिळू शकेल. 

टॅक्सपासून मुक्ती 

पीपीएफच्या योजनेत तुम्हाला एक ठराविक व्याजदर मिळतो. त्यामुळे तुम्हाला त्यातून चांगले रिटर्न्स (Returns) मिळतात. त्यातून यात अजून एक फायदा असा आहे की यातून मिळणाऱ्या रिटर्न्सवर कुठलाच टॅक्स तुम्हाला द्यावा लागत नाही. जेव्हा तुम्ही या योजनेत गुंतवणूक करता तेव्हा तुम्ही साठवलेल्या पैशांवर आणि व्याजातून मिळालेल्या उत्पन्नावरही करमुक्ती मिळते. 

हेही वाचा - Beshram Rang मध्ये शाहरूखनं घातलेल्या चपला, चष्मा आणि शर्टची किंमत पाहून भगव्या बिकीनीचा वादही विसराल

काय आहेत या स्किमचे फायदे? 

या स्किममध्ये तुम्ही 15 वर्षांसाठी गुंतवणूक करू शकता आणि सोबतच 5-5 वर्षांनंतर या योजनेचा टेन्योर (tenure) वाढवू शकता. तुम्ही या स्किमला मुदतीच्या वेळेत बंद करू शकत नाहीत. या योजनेतून तुम्ही कमीत कमी 500 ते जास्तीत जास्त 1.5 लाखांची गुंतवणूक करू शकता.  ही योजना परतावा, करमुक्ती (Tax Benefits) आणि सुरक्षा या तीन गोष्टींसाठी ओळखली जाते. ही दीर्घकालिन योजना 1968 पासून सुरू करण्यात आली होती. सध्या या योजनेचे लाभार्थाही खूप आहेत. तर मग तुम्ही या योजनेतून गुंतवणूक केली नसेल तर आजच करा आणि तुम्हाला या योजनेचा चांगला फायदा होईल.