प्रद्युम्न मर्डर केस : कंडक्टरने सांगितले काय झाले 'त्या' दिवशी

 जेलमधून सुटल्यानंतर कंडक्टर अशोकने पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत.

Updated: Nov 24, 2017, 05:41 PM IST
 प्रद्युम्न मर्डर केस : कंडक्टरने सांगितले काय झाले 'त्या' दिवशी  title=

गुडगाव : रेयान इंटरनॅशनल स्कूलचा विद्यार्थी प्रद्युम्न हत्येप्रकरणी कंडक्टर अशोकला अटक करण्यात आली होती. जेलमधून सुटल्यानंतर कंडक्टर अशोकने पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत.

मुलाला वाचवण्याची शिक्षा

शाळेच्या शौचालयात जखमी मुलाला वाचविण्याची मोठी शिक्षा मला सहन करावी लागली असा आरोप अशोकने केला आहे.

अशोकने कारपर्यंत नेले 

अशोक मुख्य दरवाजातून बाथरूमच्या दिशेने जात होता. बाथरुमच्या बाहेर त्याला माळी हरपाल भेटले. अशोकला हरपाल यांनी जखमी विद्यार्थ्यास बाहेर नेण्यास सांगितले. विद्यार्थ्याची हालत बघून अशोकने त्याला उचलून घेतले आणि बाहेर शिक्षकांच्या कारपर्यंत घेऊन गेला आणि नंतर शाळेतच राहिला.

पोलिसांनी केली चौकशी 

अशोक म्हणतो, ८ सप्टेंबरचा तो भयानक दिवस मी कधीच विसरणार नाही. दुपारी ११ वाजता ४-५ पोलीस कर्मचारी शाळेच्या वर्गात मला तु कुठे होतास ? काय केलस ? असे प्रश्न विचारू लागले. तेव्हाच मला खेचत नेऊन त्यांनी गाडीत भरले आणि सोहना पोलीस ठाण्यात घेऊन गेले. 

मारहाण आणि करंट 

पोलिस स्थानकात नेल्यावर मला कानाखाली मारण्यास त्यांनी सुरुवात केली. खूप वेळ सर्वजण मला मारत राहिले. बोल, तुच हत्या केलीस ? असे बोलत राहिले. मुलाची हत्या केल्याची कबुली द्यावी म्हणून बऱ्याचदा मला करंटही देण्यात आला. 

इंजेक्शन दिले 

 माझ्या हाताला इंजेक्शन देण्यात आले. ज्यामुळे मला नशेसारखे झाले. त्यानंतर त्यांनी माझ्याकडून काय वदवून घेतले हे मला माहित नाही असे अशोकने सांगितले.