मोदींच्या पत्रावर प्रणवदांच्या मुलीने दिले सुंदर उत्तर

 माजी राष्टपती प्रणव मुखर्जी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एक भावपूर्ण पत्र लिहिले. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Aug 3, 2017, 06:50 PM IST
 मोदींच्या पत्रावर प्रणवदांच्या मुलीने दिले सुंदर उत्तर title=

नवी दिल्ली :  माजी राष्टपती प्रणव मुखर्जी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एक भावपूर्ण पत्र लिहिले. 

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना मोदी लिहिलेल्या पत्रात म्हटले की,  प्रणव दा आपला राजकीय प्रवास वेगवेगळ्या पक्षातून झाला आहे. बराच प्रसंगात आपली विचारधारा वेगळी राहिली आहे. आपले जीवन अनुभवही वेगळे आहेत. माझ्याकडे केवळ माझ्या राज्याचा प्रशासकीय अनुभव होता, त्या उलट तुमच्याकडे अनेक दशकांचा राष्ट्रीय राजकारणाचा आणि नीतींचा अनुभव होता. तरीही आपण आपसात सामंजस्याने काम करू शकलो. 

राष्ट्रपती म्हणून कार्यालयात माझ्या शेवटच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक पत्र पाठविले, त्याने माझे मन जिंकले, मी सर्वांसाठी शेअर करत आहे. 

 

पंतप्रधानांनी माजी राष्ट्रपतींना लिहिलेल्या या पत्रानंतर प्रणवदा यांची कन्या आणि काँग्रेस पक्षाच्या नेता शर्मिष्ठा मुखर्जी यांनी ट्विट करून मोदींना धन्यवाद म्हटले आहे. 

शर्मिष्ठा यांनी मोदींनी ट्विट करताना म्हटले की एक मुलगी म्हणून तुम्हांला धन्यवाद देते श्रीमान नरेंद्र मोदी जी. पण भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची कार्यकर्ती म्हणून मी तुमच्या सरकारच्या जनविरोधी योजनांवर नेहमी टीका करत राहणार.. ही लोकशाहीची सुंदरता आहे. 

 

भारताचे १३ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून प्रणवदा यांचा कार्यकाळ २४ जुलै २०१७ रोजी पूर्ण झाला.