Video : 'काय डोंगर, काय झाडीच्या नादात' असं Pre-wedding photoshoot नको रे देवा, कपलसोबतची घटना ऐकून अंगावर येईल काटा

Pre-wedding photoshoot : लग्न हे प्रत्येक वधू - वराच्या (bride groom video) आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण असतो. आजकाल या आठवणी अजून सुंदर करण्यासाठी Pre-wedding photoshoot फाड आलं आहे.

Updated: Dec 12, 2022, 10:21 AM IST
Video : 'काय डोंगर, काय झाडीच्या नादात' असं Pre-wedding photoshoot नको रे देवा, कपलसोबतची घटना ऐकून अंगावर येईल काटा title=
Pre-wedding shoot To-be bride falls into water Kerala Shocking video nmp

Pre-wedding photoshoot : लव्ह मॅरेज (Love marriage) असो किंवा अँरेज मॅरेज (arranged marriage) गेल्या काही वर्षांमध्ये वधू - वर लग्नापूर्वी (bride groom video)  सुंदर आठवणींना कैद करण्यासाठी Pre-wedding photoshoot करतात. सोशल मीडियावर (Social media) आपल्याला अनेक व्हिडिओ (Video) पाहिला मिळतात. काय डोंगर, काय झाडीच्या नादात हे कपल कुठे कुठे जातात. शिवाय आपलं प्री वेडिंग फोटोशूट इतरांपेक्षा कसं हटके होईल यासाठी भन्नाट आयडिया शोधून काढतात. पण जर तुम्ही पण Pre-wedding photoshoot करण्याच्या विचारात असाल तर आधी ही बातमी वाचा. 

...आणि ती नवरी

Pre-wedding photoshoot करताना एक छोटी चूक तुम्हाला महागात पडू शकते. प्री- वेडिंग फोटोशूटदरम्यान एका कपलसोबत (couple video) धक्कादायक (Shocking) घटना घडली आहे.  हे कपल एका पाण्याने भरलेल्या खदानाजवळ फोटोशूट करतं असताना क्षणात होत्याचं नव्हतं झालं. ते दोघे भावी आयुष्याचे स्वप्न रंगवत असताना एकमेकांमध्ये रमले असताना नवरीचा पाय घसरला आणि ती थेट दरीत कोसळली. हे पाहताच क्षणी जीवाची परवा न करता नवरदेवानेही 50 फूट खोल दरीत उडी मारली. 

हेसुद्धा वाचा - Pre Wedding Video : न्यूड होत, आग लावत, चिखलात दिली प्रेमाची कबुली, 'हे' टॉप 10 फोटोशूट पाहून बसेल धक्का

तिथे उपस्थित इतर लोकांनी पोलिसांना मदतीसाठी बोलवलं आणि बचाव पथकाने त्यांना वाचवलं. मात्र या दुर्घटनेत महिलेच्या पायाला दुखापत झाली आहे. त्यामुळे या दाम्पत्याचं लग्न 3 महिन्यांसाठी पुढे ढकलण्यात आलं आहे. ही घटना केरळमधील (Kerala) केलराच्या कोल्लम जिल्ह्यात घडली आहे. (Pre-wedding shoot To-be bride falls into water Kerala Shocking video)

यापूर्वीही केरळमधील एका कपलसोबत धक्कादायक घटना घडली होती. या कपलने मंदिरात हत्तीजवळ फोटोशूट केली आणि ते त्यांना महागात पडलं. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

फोटोशूट दरम्यान हत्तीला अचानक राग आला आणि त्यानंतर या हत्तीने एका माहुतवर हल्लादेखील केला.