राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे 'र' अक्षराशी आहे हे नाते

'र' रामनाथ, 'र' राज्यसभा, 'र' राज्यपाल पद सांभाळल्यानंतर आता 'र' पासून राष्ट्रपतीच्या रुपात र रायसीना हिल्स स्थित 'र' राष्ट्रपती भवनात राहणार आहेत. भारताचे १४वे राष्ट्रपती म्हणून रामनाथ कोविंद यांनी शपथ घेतली. कोविंद यांच्या जीवनात र या अक्षराचे महत्त्व विशेष आहे. 

Updated: Jul 25, 2017, 10:09 PM IST
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे 'र' अक्षराशी आहे हे नाते title=

लखनऊ : 'र' रामनाथ, 'र' राज्यसभा, 'र' राज्यपाल पद सांभाळल्यानंतर आता 'र' पासून राष्ट्रपतीच्या रुपात र रायसीना हिल्स स्थित 'र' राष्ट्रपती भवनात राहणार आहेत. भारताचे १४वे राष्ट्रपती म्हणून रामनाथ कोविंद यांनी शपथ घेतली. कोविंद यांच्या जीवनात र या अक्षराचे महत्त्व विशेष आहे. 

इतिहासाची पाने चाळल्यास लक्षात येईल की राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्यापासून ते आज राष्ट्रपतीपदाची शपथ घेणारे कोविंद यांच्यापैकी अनेकांच्या नावार 'र' हे अक्षर आहेच.

राजकारणात आल्यानंतर त्यांनी भारतीय जनता पक्षात जाण्याचे ठरवले. त्यांनी घाटमपूर आणि भोगनीपूर विधानसभेतून त्यांनी निवडणूक लढवली. या विधानसभा मतदारसंघाच्या नावातही 'र' हे अक्षर आहेच. ते भाजप दलित मोर्चाचे अध्यक्षही होते. राज्यसभेतवरही निवडून गेले. त्यानंतर बिहारचे राज्यपाल बनले. यातही 'र' हे अक्षर आलेच. 

'र' या अक्षराचे कोविंद यांच्या आयुष्यात विशेष स्थान आहे. त्यांच्यानावापासून ते नवे घर रायसीना हिल्स स्थित नव्या घरापासून ते राष्ट्रपती भवनातही 'र' हे अक्षर आहेच.  

कोविंद यांचा जन्म एक ऑक्टोबरला कानपूरच्या देहातमधील परौख गावांत झाला होता. म्हणजेच ऑक्टोबर, कानपूर, परौख या तीनही अक्षऱांमध्ये 'र' हे अक्षर येतेच. 

राष्ट्रपती निवडणुकीत त्यांच्याप्रतिस्पर्धी उमेदवारा मीरा कुमार यांच्या नावातही 'र' हे अक्षर होतेच. आज राष्ट्रपतीपदाची शपथ घेतल्यानंतर ते रायसीना हिल्स स्थित राष्ट्रपती भवनात राहणार आहेत.