...तर पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणूक हरले असते; राहुल गांधी यांचा खळबळजन दावा

 काँग्रेस नेते राहुल गांधी लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबत  खळबळजन दावा केला आहे. राहुल गांधी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.

वनिता कांबळे | Updated: Jun 11, 2024, 08:02 PM IST
...तर पंतप्रधान नरेंद्र मोदी  निवडणूक हरले असते; राहुल गांधी यांचा खळबळजन दावा title=

PM Modi vs Rahul Gandhi : नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली आहे.  काँग्रेस नेते राहुल गांधी लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबत  खळबळजन दावा केला आहे. राहुल गांधी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.  नरेंद्र मोदी निवडणूक हरले असते असा दावा राहुल गांधी केला आहे. मोदी निवडणूक का हरले असते याबाबतचा खुलासा देखील राहुल गांधी यांनी केला आहे.      

लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाराणसीमधून विजय मिळवला. मात्र त्यांच्या मताधिक्यामध्ये घट झाली आहे. यंदा मोदी अवघ्या दीड लाख मतांनी विजयी झाले आहेत. 2019मध्ये मोदींनी 4 लाखांच्या फरकानं निवडणूक जिंकली होती.
राहुल गांधी काय म्हणाले.   

माझी बहिण प्रियंका गांधी जर वाराणसीतून निवडणूक लढली असती तर पंतप्रधान 2 ते 3 लाख मतांनी लोकसभा निवडणूक हरले असते...असा खळबळजनक दावा राहुल गांधी यांनी केलाय. अमेठीतून लोकसभा निवडणुक जिंकल्यानंतर राहुल गांधींची आभार सभा पार पडली..यावेळी ते बोलत होते.

लोकसभा निवडणुकीत अमेठी आणि रायबरेलीतून जिंकल्यानंतर काँग्रसचे राहुल गांधी आणि प्रियांका गांधी  आभार सभा घेणारेत. या मतदारसंघातून मोठ्या मताधिक्क्यांनी निवडून दिल्यानं गांधी कुटूंब जनतेचे आभार मानणार आहे.

शरद पवारांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना इशारा

भटकता आत्मा तुम्हाला सोडणार नाही असा थेट इशारा शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिलाय... लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शरद पवारांचं नाव न घेता भटकती आत्मा अशी टीका केली होती. त्यालाच पवारांनी प्रत्युत्तर दिलंय.. भटकता आत्मा कधी मरत नाही आणि हा भटकता आत्मा तुम्हाला सोडणार नाही असा इशारा पवारांनी जाहीर सभेत दिलाय.